प्रा. सुभाष माने यांच्या वाढदिवसानिमित्त तुळसाई उद्योग समूह व दूध संकलन ईश्वर वठार यांच्यावतीने घड्याळाचे वाटप

ईश्वर वठार (कटूसत्य वृत्त):- तुळसाई उद्योग समूह व दूध संकलन ईश्वर वठार यांच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती प्राचार्य सुभाषराव माने यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त ईश्वर वठार मधील दूध संकलन यांच्यावतीने सभासदांना मोठ्या प्रमाणात घड्याळ वाटप करण्यात आलं व तुळसाई उद्योग समूह यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितीत ईश्वर वाठारचे सरपंच सीता देवी माने, पंढरपूर तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने, पंचायत समितीचे माजी सदस्य औदुंबर मिटकरी, तुळसाई उद्योग समूहाचे मुख्य प्रवक्त मनीषा औदुंबर मिटकरी, सद्गुरु मिटकरी, डॉक्टर प्रतापसिंह माने, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महावीर नाना देशमुख, माजी सहाय्यक फौजदार हनुमंत देशमुख, ईश्वर पठारचे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मधु चौगुले, विक्रम सिंह माने, पैलवान आप्पासाहेब खांडेकर, ईश्वर वठार चे उपसरपंच विजयसिंह माने, माजी चेअरमन संजय देशमुख, अजय सिंह माने, मुकुंद मेटकरी, विकास माने, खंडू नाना मिटकरी, संपूर्ण तुळसाई दूध समूहातील सभासद उपस्थित होते व ईश्वर वठार मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment