सोलापूर सिंहगड मध्ये 'टेक्नोसिंह २के२२' आणि 'आविष्कार ' उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 20, 2022

सोलापूर सिंहगड मध्ये 'टेक्नोसिंह २के२२' आणि 'आविष्कार ' उत्साहात संपन्न

सोलापूर सिंहगड मध्ये 'टेक्नोसिंह २के२२' आणि 'आविष्कार ' उत्साहात संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगांव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्नोसिंह २के२२ आणि आविष्कार- कॉलेज लेव्हल हा तांत्रिक महोत्सव  उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घघाटन डॉ.श्रीराम राऊत, महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री.शशांक देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित  होते. यावेळी सुनील शाखापूरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.विद्यार्थ्यांनी टेक्नोसिंह २के२२ मध्ये कोड विथ सी , टेक्निकल क्विझ अँड कोडींग, ऍपटीट्यूड क्विझ, सोशल शॉर्ट फिल्म, कॅडवार अशा टेक्निकल इव्हेंट मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  व आविष्कार हा सेंट्रल लेव्हल इव्हेंट मध्ये विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट आयडिया आणि पोस्टर प्रेझेंटेशन सादर केले.या विविध स्पर्धेमधून एकूण ४७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अशा तांत्रिक महोत्सवातून विद्यार्थ्यांची कल्पकशक्ती विकसित होते. विद्यार्थीदशेत तांत्रिक महोत्सवामुळे  विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास विकसित होत असतो.या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुमेध पाठक आणि प्रा. सुनील शाखापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सेक्रेटरी चिन्मय झोड , ओंकार कोठे, सुजाता दूधभाते, नोमन शेख, कृष्णात कापसे, शाकिब शेख, मुस्तफा शेख यांनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉ.श्रीराम राऊत, शशांक देशमुख, अविनाश लावणीस यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रंचालन ऋतुजा राऊत व सुझान नदाफ यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages