मराठा सेवासंघाचे मराठारत्न पुरस्कार जाहीर फाळके, पाटील, मुळे, हजारे, काटुळे,पुरस्कारांचे मानकरी सोमवारी डॉ. फडकुले सभागृहात वितरण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येेणार्या मराठारत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या पुरस्कारांचे रामचंद्र फाळके, ऋतुजा पाटील , दत्तात्रय मुळे, राजेंद्र हजारे, अरूण पाटील, प्रकाश काटुळे मानकरी आहेत. सोमवारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

.jpeg)
यंदा पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे .कोरोना कालावधित खंड पडलेली पुरस्कारांची परंपरा पुन्हा चालू केली आहे. सोमवार 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5. वाजता डॉ. निर्मलकुुमार फडकुले सभागृहात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तर बार्शीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांच्या प्रमुख उपस्थित वितरण सोहळा होणार आहे.
.jpeg)
यंदाचे पुरस्कार अनिल रामचंद्र फाळके (राजस्तरीय शैक्षणिक पुरस्कार) ऋतुजा राजन पाटील (युवती पुरस्कार). दत्तात्रय संदिपान मुळे (उद्योजकता), राजेंद्र कुुंडलीक हजारे (सहकार) अरूण परशुराम पाटील (सामाजिक) प्रकाश मधुसूदन काटुळे (क्रीडा) यांना जाहीर झाला आहे.
.jpeg)
तरी या पुरस्कार वितरणसोहळ्यास उपस्थित राहवे, असे अवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ बिग्रेड, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, तानुबाई बिरजे पत्रकार कक्ष,वधुवर कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.मराठा रत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा अल्पपरिचय
अनिल रामचंद्र फाळके (राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार)
1989 पासून स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आजपर्यंत साधारण 600 अधिकारी महाराष्ट्र व राष्ट्रसेवेत कार्यरत आहेत. गरीब विद्यार्थ्याना मोफत प्रशिक्षण. याशिवाय शेतीमाल प्रक्रिया संस्था, शिवनेरी नागरी पतसंस्था, सहयोग फौंडेशन, सेंद्रीय शेती, प्रसार व प्रचार कार्य, अनेक सामाजिक कार्यात सहभाग.
ऋतुजा राजन पाटील (राज्यस्तरीय युवती पुरस्कार)
अनगर सारख्या ग्रामिण भागातील कन्या पुणे येथिल सेंट हेलेनाज स्कूल प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बॅचलर इन ओविएशन मॅनजमेंट शिक्षण कॉव्हेंटरी विद्यापीठ इंग्लंड इथून पूर्ण केले. नंतर पॅसीफीक प्रोफेशनल फ्लाईट सेंटर, व्हॅनक्युअर कॅनडा येथे कमर्शिअल पायलटचे प्रशिक्षण घेतले. सध्या एअरनॉर्थ या कंपनीच्या कमर्शियल पायलट म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मुलींना सहकार्य व मार्गदर्शन करतात. कोव्हीड काळात फुड डिलीव्हरी व एअरपोर्टवर पार्टटाईम सेवा केली. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कन्या आहेत.
दत्तात्रय संदीपान मुळे (जिल्हास्तरीय उद्योजकता पुरस्कार)
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे चेअरमन सकल मराठा मोर्चा व मराठा सेवा संघाचे समन्यवक ,अर्थमुव्हर्स असोसिएशन माध्यमातून कार्यरत, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदावर असताना वाखाणण्यासारखे कार्य. गेली दोन दशकं कन्स्ट्रक्शन व्यवसायात कार्यरत. दिग्विजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, दिग्विजय ट्रेडर्स, दिग्विजय हॉट मिक्सर प्लांट, दिग्विजय आर.एम.सी., दिग्विजय ट्रॅक्टर एजन्सी व ठेकेदार आदी व्यवसायांची बांधणी शेकडो कामगारांच्या हाताला काम.
राजेंद्र कुंडलीक हजारे (सहकार पुरस्कार)
गेली पंचवीस वर्षे सहकार क्षेत्रात अथक कार्य. राजमुद्रा लॉईफ स्टाईल व शोरुमच्या माध्यमातून यशस्वी व्यवसायीक म्हणून ओळख. जनकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून 27 शाखा व 150 कोटींची डिपॉझिट. दहा हजार महिलांना बचतगट मार्फत कर्ज वाटप. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. सहकार प्रतिभा या मासिकामार्फत सहकार क्षेत्रातील उत्तम कार्य करण्यार्या संस्थांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न.
अरुण परशुराम पाटील (सामाजिक पुरस्कार)
शिक्षक म्हणून चार दशक सेवा. स्कॉलरशीप परिक्षेत शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत. गुणवंत पुरस्कार 2005. आदर्श क्रीडा पुरस्कार, विविध संस्थाचे 9 आदर्श पुरस्कार, महिला बचत गटामध्ये उल्लेखनीय कार्य. शेकडो महिलांना व्यवसायासाठी मदत. उत्तरप्रदेश सरकारकडून नारीरत्न पुरस्कार. आंध्रप्रदेश सरकारकडून बचतगट कार्यासाठी पुरस्कार. निवृत्तीनंतर गावातील सामाजिक कार्यात वाहून घेतले. प्रभुलिंग देवस्थानच्या माध्यमातून वडापूर पर्यटन स्थळ विकासासाठी अहोरात्र प्रयत्न
प्रकाश मधुसुदन काटुळे (क्रीडा पुरस्कार)
तलवारबाजी या क्रीडा प्रकाराचा राज्यभर प्रसार व प्रचार. सोलापूरमध्ये प्रथम सुरुवात सध्या राज्यात 36 जिल्ह्यात सुरु आहे.साधारण पाचशे विद्यार्थी राज्यपातळीवर 15 खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार केले. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2015 मध्ये प्राप्त, शिक्षकरत्न, आदर्श शिक्षक 2010, क्रीडापरिषद आदर्श पुरस्कार. सध्या महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशनचे कार्याध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य.
No comments:
Post a Comment