एस.आर. परदेशी व टी.एस. काटे यांना शिपाई पदावर बसवण्यात यावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 18, 2022

एस.आर. परदेशी व टी.एस. काटे यांना शिपाई पदावर बसवण्यात यावे

 एस.आर. परदेशी व टी.एस. काटे यांना शिपाई पदावर बसवण्यात यावे

प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

पुणे (कटूसत्य वृत्त):- हवेली क्रमांक 10 चे तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक एस. आर. परदेशी व हवेली क्रमांक 1चे तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक टी. आर. काटे यांचे डिमोशन करून यांना शिपाई पदावर बसवण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन सादर करून केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील म्हणाले की तत्कालीन सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 3 व हवेली क्रमांक 9 चे एस. आर. परदेशी तसेच हवेली क्रमांक 1 चे तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक टी.एस. काटे यांनी नियमबाह्य दस्त नोंदणी करत तुकडे बंदी कायदा व रेरा कायद्याचे भंग करून शेकडो दस्तांची नोंदणी केली आहे.यांनी अशा प्रकारचे दस्त नोंदणी करून देखील यांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. याउलट यांची पदोन्नती करण्यात आली आहे.आणि ही बाब अतिशय गंभीर असून यास त्वरीत स्थगिती देण्यात आली पाहिजे. व स्पेशल टीम मार्फत यांची चौकशी करावी अशी आग्रहाची मागणी करत पुढे  रोहन सुरवसे पाटील म्हणाले की हवेली क्रमांक 1 चे तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक टी.एस. काटे यांनी अनधिकृत सदनिकेचे व शेत जमिनीचे तुकडे पाडून यास सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता शेकडो दस्तांची दस्त नोंदणी केली आहे.आणि हे सर्व पुरावे मी सादर केले आहेत. एस. आर. परदेशी व टी.एस. काटे यांनी येवढ्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करुनही यांची पदोन्नती करण्यात येते आणि आता पोस्टिंग ऑर्डर पण आता देण्यात आली आहे.
 यामागचा उद्देश  काय असावा? असा सवाल उपस्थित करत रोहन सुरवसे पाटील यांनी विशेष पथकाकडून या दोन्हीं निबंधक यांची सखोल चौकशी करून त्यांचे डीमोशन करत यांना शिपाई पदावर बसवण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सुरवसे पाटील यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages