सुनिल पाटील यांना बेळगावच्या संस्थेचा आंतरराज्य उद्योग क्षेत्रातील गौरव पुरस्कार प्रदान

माढा (कटूसत्य वृत्त):- बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अॅन्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी च्या वतीने दिले जाणारा आंतरराज्य उद्योग क्षेत्रातील पुरस्कार माढा तालुक्यातील सापटणे(भोसे) गावातील सुनिल पितांबर पाटील यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र,गोवा,व कर्नाटक या तिन राज्यांतील सामाजीक,शैक्षणिक,सहकार,बांधका म,आरोग्य आदीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सुनिल पाटील यांनी उद्योग क्षेत्रात अनेक बेरोजगार तरूणांना नोकरीची संधी देऊन गोरगरिब तरुणांचे संसार उभे केले.याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असुन त्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्यात.
No comments:
Post a Comment