आ. बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बेंबळे येथे २५५ रक्तदात्यांचे रक्तदान ...


बेंबळे (कटूसत्य वृत्त):-आ. बबनराव शिंदे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त बेंबळे व परीसरातील भोसलेवाडी, हरिनगर, मिटकलवाडी, घोटी, काळे वस्ती या गावातील २५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य रणजितभैया शिंदे यांनी या शिबिरास भेट दिली, सोसायटीचे माजी चेअरमन संजय शंकर पवार व माजी सरपंच कैलास पांडुरंग भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. रक्तदान शिबिरास अपेक्षेपेक्षाही अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याबद्दल रणजीत शिंदे यांनी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत रक्तदात्यांना अल्पोपहार देउन , हेल्मेट भेट देण्यात आले, शिबीराचे उद्घाटन श्री गणेशाची आरती करून करण्यात आले.
या प्रसंगी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण,विष्णु हुंबे, मा. सरपंच कैलास भोसले, मिटकलवाडीचे उपसरपंच रविंद्र श्रीखंडे, घोटीचे युवा नेते राजाभाऊ बागल, सरपंच संजय वनवे, राष्ट्रवादी कीसान सेल चे तालुका अध्यक्ष भजनदास गायकवाड , सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय पवार, तानाजी भोसले, एकनाथ भोसले, भिमराव पवार, पोपट चव्हाण, मोहन लोकरे, नवनाथ सुरवसे, माणिक मिटकल, संजय मिटकल, बिटू गळगुंडे, अनिल अवताडे यांच्यासह बेंबळे व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते, सोलापूर ब्लड बँकेने रक्त संकलन केले.
सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डीग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थीटे शेतकी अधिकारी सुनील बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे बेंबळे गट-सुपरवायझर चिंतामणी बी एस, सुरवसे आर जी, ढवळे एस आर, महाडिक डि आर, चोपडे एस ए, खांडे ए एस यांनी विशेष परीश्रम घेतले.
No comments:
Post a Comment