गर्भवती व बाळंतीण महिलासाठी तपासणीसह मार्गदर्शन शिबीर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 3, 2022

गर्भवती व बाळंतीण महिलासाठी तपासणीसह मार्गदर्शन शिबीर संपन्न

 गर्भवती व बाळंतीण महिलासाठी तपासणीसह मार्गदर्शन शिबीर संपन्न        


 "अकलूज इनरव्हील क्लबच्या वतीने कौतुकास्पद उपक्रम"


अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज इनरव्हील क्लब अकलूज,उपजिल्हा रुग्णालय अकलूज, रोटरी क्लब अकलूज व इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानाने

गरोदर व बाळंतीण महिलांसाठी मोफत तपासणी व तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

        यावेळी डॉटर मॉम् फाऊंडेशन अध्यक्ष सौ शितलदेवी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिबिर संपन्न झाले. यावेळी सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.सतीश दोशी, डॉ. महेश गुडे उपस्थित होते.

यावेळी सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मानसी देवडीकर यांनी सर्व महिलांना बाळाला कशा पद्धतीमध्ये स्तनपान करावे, स्तनपानाचे फायदे व तोटे महिलांच्या आरोग्यावर होणारे चांगले व वाईट परिणाम यावर माहिती दिली. तर बाळाला आईचे दूध कसे महत्त्वाचे असते. त्याच्यावर बाळाचे पूर्ण आरोग्य कसे निगडित असते हे छान पद्धतीने समजावून सांगितले.तर डॉ. सौ. सविता गुजर स्त्रीरोग तज्ञ यांनी ज्या महिलांना आधीपासूनच कोणतेतरी आजार असतात. जसे की डायबेटीस क्षयरोग उच्च रक्तदाब किंवा असेच कोणतेही आजार असतील तर त्या महिलांनी घ्यावयाची काळजी आणि त्या महिलांनी मुलांना स्तनपान करावे किंवा नाही करावे, म्हणजेच हाय रिस्क प्रेग्नेंसी यावर खूप छान पद्धतीने  मार्गदर्शन केले. इनरव्हील  क्लबच्या अध्यक्षा डॉ.सौ. श्रद्धा जवंजाळ यांनी सांगितले की महिलांचे आरोग्य महत्त्वाचे आहेत तरच कुटुंबाचे आरोग्य नीट राहते.पण त्यातूनही गरोदर महिला व बाळंतीण महिला यांचा हा दुसरा जन्म असतो. यावेळेस फार काळजीपूर्वक आपण पूर्ण माहितीने सर्व गोष्टी करायला हव्यात यासाठी हे मार्गदर्शन आयोजित केले व त्यास भरघोस असा प्रतिसाद मिळाला. जवळपास 70 ते 80 गरोदर व बाळंतीण महिला यांनी यांचा लाभ घेतला तसेच त्यांना पौष्टिक आहाराचे सुद्धा वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी सूत्र संचालन डॉ.वैष्णवी शेटे यांनी केले.तर आभार केतन बोरावके यांनी मानले.यावेळी आयएसओ अमोलिका जामदार,स्वाती चंकेश्वरा यांनी अधिक परिश्रम घेतले.

 यावेळी शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या की  गरोदर महिलांनी मुलगा होऊ दे अगर मुलगी होऊ दे,तुम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा, असा संदेश आपल्या मार्गदर्शनातून महिलांना दिला. तर बेटी बचाव या उपक्रमांमधून  राज्यभर राबवलेल्या कार्याला उजाळा देत त्यांनी माळशिरस तालुक्यात  डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages