आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 28, 2022

आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


 

            मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            मंत्रालयात राज्य वस्तुसंग्रहालय साकारण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयउपसचिव विलास थोरातविद्या वाघमारेपुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गेआर्किटेक्ट राहुल गोरे,बतुल राज मेहताडॉ. कुरूष दलालमारिया तालिब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री  मुनगंटीवार म्हणालेअनेक राज्यांनी आपली राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण केली असून आपल्या या संग्रहालयात आपल्या राज्याचा इतिहासकला आणि संस्कृती दर्शविली आहे. महाराष्ट्रातही राज्य संग्रहालय निर्माण करताना महाराष्ट्राचा ऐतिहासिकसांस्कृतिक इतिहास आणि प्रगती प्रतिबिंबित करण्यात येईल.

            अश्मयुगापासुन ते आधुनिक काळापर्यंत महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यासाठी संचालनालयामार्फत कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी. तसेच देशातील सर्वोत्तम वस्तूसंग्रहालये यांची पाहणी आणि अभ्यास तातडीने करण्यात यावा अशा सूचनाही मंत्री  मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. आवश्यकता वाटल्यास आपण सुद्धा बिहार येथील वस्तूसंग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे भेट देणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

            या संकल्पिक वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्वाचे कालखंड-अश्मयुगीनप्रागैतिहासिक काळऐतिहासिक व मध्ययुगीन काळमराठा व ब्रिटिश कालखंडमहाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृतीस्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आधुनिक महाराष्ट्रासंबंधी विविध दालने उभारणार असून, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण करताना सल्लागार समिती स्थापना करण्यात आली आहे. या सदर समितीमध्ये पुरातत्त्वशास्त्रवस्तुसंग्रहालय शास्त्रइतिहाससंस्कृतीकलाविज्ञानप्रशासनवास्तु व स्थापत्यशास्त्रइ. विषयातील १८ तज्ज्ञ संदस्यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages