जि. प. समोरील गाळे स्थलांतरासाठी तीन महिन्याची मुदत; 50 टक्के दंड भरण्याचे आदेश

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- झेडपी येथील गाळेधारकांनी ताबडतोब 50 टक्के अनधिकृत दंडाची रक्कम पालिकेकडे जमा करावी तसेच उर्वरित रक्कम पुढील महिन्यात अदा करावी त्याचबरोबर खोकेधारकांना हे गाळे स्थलांतरासाठी येत्या तीन महिन्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषद आवारातील खोके हटविण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने काही दिवसापूर्वी हाती घेतली होती. दरम्यान मंत्र्यांचा फोन आल्याने ही कारवाई स्थगित झाल्याची मोठी चर्चा होती. त्यादिवशी महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे परगावी गेले होते. सोलापुरात आल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
दरम्यान जिल्हा परिषद आवारातील गाळेधारकांनी अनधिकृत दंडाची रक्कमही भरली नाही. त्यांना रस्त्यावर खोके थाटता येणार नाहीत. सन 2015 मध्येच कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला आहे. त्याच वेळी महापालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. त्यानंतर कारवाई हाती घेण्यात आली.
येथील खोकेधारकांनी जिल्हा परिषद प्रशासनाची चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. त्या ठिकाणी खाली पार्किंग व वर गाळे बांधण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे असे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद आवारातील खोकेधारकांना खोके स्थलांतरित करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली आहे. या खोकेधारकांनी ताबडतोब अनधिकृत दंडाची 50 रक्कम महापालिकेकडे जमा करावयाची आहे तसेच पुढील महिन्यात उर्वरित रक्कम अदा करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी . शिवशंकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment