सोलापूर महानगरपालिका अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३,शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 व स्वच्छ वायु दिवसाचे औचित्य साधून सोलापूर बायो एनर्जी कंपनीच्या पुढाकाराने शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन होणे करिता व त्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाऊल उचलले असुन महानगरपालिकेच्या रुपाभवानी ट्रान्सफर स्टेशन येथे कंपनी मार्फत पहिले ड्राय वेस्ट कलेक्शन सेंटर स्थापन करण्यात आले. असून त्याचे उदघाटन महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आसुन सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, कंपनीचे सारंग भांड, यश भांड, पंकज तनवार, भगवान कारंडे, विक्रम देशमुख तसेच सोमपाचे मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक वाहन नागेश मेंडगुळे, मुख्य आरोग्य निरीक्षक केदार गोटे, लोखंडे, तेजस शहा, गिरीश तंबाके, स्वप्नील सोलनकर हे उपस्थित होते.या ड्राय वेस्ट कलेक्शन सेंटर मधे वेगवेगळ्या प्रकारच्या रिसायकलेबल कचरा वेगळा करून ई.पि.आर. अंतर्गत रिसायकलिंग करणारया एजन्सीना पाठविण्यात येईल. सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की रिसायकलेबल कचरा म्हणजेच पेट बाटल्या, काचेच्या वस्तू, कार्डबोर्ड, रद्दी पेपर, वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकच्या वस्तू, पाउचेस , पिशव्या या कलेक्शन सेंटर मध्ये जमा करणार्यांना ईनसेंनटीव्ह (लाभांश) देण्यात येईल. लवकरच ई-कचराही घेण्यात येईल. पुढील तीन महिन्यात कंपनीच्या वतीने महानगरपालिकेच्या उर्वरीत सर्व ट्रान्स्फर स्टेशनवर अशाच प्रकारे ड्रयवेस्ट कलेक्शन सेंटर स्थापन करण्यात येईल. आमची सर्व शहरवासीयांना विनंती आहे की या संकल्पात सर्वानी एकत्र येऊन सहकार्य करावे व आपले शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment