सरकार तुमच्या पाठीशी ; सर्वसामन्यांपर्यंत योजना पोहचवा - तानाजीराव सावंत , आरोग्यमंत्री - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 6, 2022

सरकार तुमच्या पाठीशी ; सर्वसामन्यांपर्यंत योजना पोहचवा - तानाजीराव सावंत , आरोग्यमंत्री

सरकार तुमच्या पाठीशी ; सर्वसामन्यांपर्यंत योजना पोहचवा - तानाजीराव सावंत , आरोग्यमंत्री

प्रशांतबापू भोसले सारख्या कट्टर कार्यकर्त्याला सहकार्य करा.

            मोहोळ (कटुसत्य वृत्त): राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सरकार उत्तमरीत्या काम करीत आहे. सरकारच्या सर्व जनहिताच्या योजना सर्व सामन्यांपर्यंत पोहचवा असे सांगत  प्रशांतबापू भोसले यांच्यासारखा होतकरू , कट्टर व निष्ठावंत  कार्यकर्ता तालुका प्रमुख झाला आहे.सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांना सहकार्य करा मी व महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.ना.तानाजीराव सावंत यांनी केले. मोहोळ येथे तालुका प्रमुख प्रशांतबापू भोसले यांच्या माध्यमातून नव्याने सुरू केलेल्या शिवसेनेच्या  संपर्क कार्यालय उद्धघाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर   जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, मनोजभाई शेजवाल आदी उपस्थित होते.

              यावेळी प्रास्ताविक करताना तालुका प्रमुख प्रशांतबापू भोसले म्हणाले , माझ्यासारख्या सातत्याने अडगळीत पडलेल्या शिवसैनिकाला  प्रा.डॉ.ना.तानाजीराव सावंत व मार्गदर्शक  प्रा.शिवाजीराव सावंत  यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं , तालुक्याचे प्रमुख केले आणि माझ्यासारख्या कट्टर सैनिकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. साहेब मी मनापासून सांगतो आपण टाकलेला विश्वास येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत  सार्थ करून दाखवेन  एवढाच शब्द या निमित्ताने देतो असे सांगत  विकासापासून कोसोदूर असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समोर आपण मांडावेत आणि सोडवावेत त्यात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा,कामती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र द्यावे ,तर कामती भागात १०८ रुग्णवाहिकेचे सेंटर करावे , पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर पेनूर येथे ट्रामा सेंटर करावे यासह अनेक मागण्या यावेळी भोसले यांनी केल्या.

              यावेळी पद्माकर देशमुख , तुकाराम भोसले , नामदेव महाराज काळे ,चैतन्य देशमुख ,अभय देशमुख , सुनील क्षीरसागर ,दादासाहेब भोसले , सौदागर भोसले , संदीप काकडे , नाना उन्हाळे , सचिन भोसले ,प्रवीण पवार, पवन गायकवाड , ज्ञानेश्वर भोसले , शेखर आगलावे ,शेखर भोसले ,अविनाश डोंगरे , जावेद विजापूरे ,सौरभ मोरे , महेश आगलावे ,शिवाजी खिलारे , कोळेगांव चे सरपंच भाऊराव शिंदे , नामदेव केवळे , बाळासाहेब दाईंगडे , सिद्धेश्वर खरात ,हणमंत खरात ,भाऊसाहेब गावडे ,भगवान शिंदे , सॅम वाघमोडे आदींसह जिल्हा व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी तर आभार नामदेव केवळे यांनी मानले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages