" चित्रोळीकार मुकुंद धोंडोपंत कुलकर्णी विद्यावाचस्पती आहेत, " - समाज भूषण नासिकेत पानसरे

मुंबई (नासिकेत पानसरे):- जेष्ठ कवी चित्रोळीकार मुकुंद धोंडोपंत कुलकर्णी, हे विद्यावाचस्पती आहेत, असा गौरव समाज भूषण पत्रकार नासिकेत पानसरे यांनी सोमवारी केला. प्रभात मित्रमंडळातर्फे विक्रोळी कन्नमवार नगरातील, ' प्रभात विरंगुळा केंद्रात, 'मुकुंद कुलकर्णी यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगीं समाजभूषण पत्रकार नासिकेत पानसरे बोलत होते. धर्मवीर संभाजी महाराज मैदानात संपन्न झालेल्या आजच्या वाढदिवस कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष कृष्णा काजरोळकर, उपसचिव श्री विलास देशनेहेरे, समाजसेवक वासुदेव कदम, माजी पोलीस अधिकारी दत्तात्रय शिखरे, भूमय्या सोमा, श्रद्धानंद निकम, माधव गुजराती आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्ती जीवनांत शिक्षक असते, मुकुंदराव कुलकर्णी हे सर्वांचे शिक्षकच आहेत. एकदां श्रद्धा ठेवली, कीं तें श्रद्धेनें काम करीत असतात. स्वतःला व्याधी असतांना देखील ते सदैव हसतमुख असतात. तें करीत असलेल्या चित्रोळींचे पुस्तक त्यांनी प्रकाशित करावें असें, प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री कृष्णा काजरोळकर यांनी आपल्या भाषणात, कुलकर्णी यांचा गौरव करतांना सांगितले. विचारवंत बुद्धिवंत तत्त्वज्ञानी असलेले मुकुंद कुलकर्णी, हें गोड जिभेचे आहेत. आज गौरी विसर्जन, शिक्षकदिन, चित्रोळीकारांचा वाढदिवस, असा त्रिवेणी योग आज आला आहे. ते सर्वांचे गुरुवर्य आहेत. संस्कार चांगले असले, तर संस्कृती टिकते. हे सर्व गुण कुलकर्णी यांच्याकडे आहेत, असें प्रास्ताविक भाषणांत वासुदेव कदम म्हणाले.
आपण देवांची स्तोत्रें म्हणतो, पठणें करतो पण त्यांत सांगितल्याप्रमाणें आपण वागतो कां ? असा सवाल करून आपण मद मत्सर क्रोध, आदि जे षडविकार आहेत, ते सोडण्यास तयार नसतो. पण हे दुर्गुण सोडले, आणि सर्वांशी आपलेपणाने वागूं लागलो, तर देव आपल्याला नक्की भेटेल, असें सत्कार मूर्ती कुलकर्णी यांनी आपले मनोगत मांडतांना विचार व्यक्त केले. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, त्याप्रमाणेंच, मित्रांवर प्रेम करावें, असेंही तें पुढें म्हणाले. याप्रसंगीं सर्वश्री चंद्रकांत कुलकर्णी, माधव गुजराती, प्रकाश गांगुर्डे, यांची भाषणें झाली. प्रभात मित्र मंडळाच्या गायक मंडळींनी नाट्य व भक्ती गीते सादर करून, वातावरण प्रफुल्लित केलें होते.
No comments:
Post a Comment