अकलूज शहर शिवसेनामय करणार : शिंदे गटाचे नूतन शहर प्रमुख महेश पवार


सांगोला (कटुसत्य वृत्त): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज शहर पूर्ण शिवसेनामय करणार असल्याचा निर्धार शिंदे गटाच्या अकलूज शहराध्यक्षपदी नूतन निवड झालेले महेश रामचंद्र पवार यांनी केला आहे.नुकतीच त्यांची अकलूज शहरप्रमुख म्हणुन त्यांची निवड झाली आहे.त्याच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. तानाजीराव सावंत यांच्या सहकार्याने शिवसेना जिल्हा संघटक शिवाजीराव सावंत यांनी दिले. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष मंगेश चिवटे, सोलापूर शहर प्रमुख मनोजभाई शेजवाल, माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकलूजच्या नूतन शहरप्रमुख या नात्याने सर्व सामान्य नागरिकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दसरा मेळाव्याला हजारों कार्यकर्ते घेवून जाणार असल्याचे नूतन शहर प्रमुख महेश पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment