दहीहंडीचा उत्साह व विद्यार्थ्यांचा जल्लोष
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सांगोला (कटुसत्य वृत्त): श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने शुक्रवार दि.19ऑगस्ट रोजी सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे सर यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता लिगाडे मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते.
दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार केले.यावेळी इतर विद्यार्थी गीताच्या तालावरती ठेका धरून साथ देत होते. शेवटी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करत गीतांवरती ताल धरला व या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही माध्यमांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी थोरात मॅडम यांनी केले तर सोनाली खडतरे मॅडम यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment