सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालय व सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 19, 2022

सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालय व सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी

सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालय व सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी

              सांगोला (कटुसत्य वृत्त):- हाथी घोडा पालखी! जय कन्हैया लाल की! श्रीकृष्ण हे हिंदूचे आराध्य दैवत आहे त्यांचा जन्मदिवस म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेत झाला. व बालपण गोकुळात गेले ह्या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी. गोविंदा आला रे आला म्हणत दहीहंडी फोडतात.

              श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर मॅडम व इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका सरिता कापसे मॅडम यांनी केले. यावेळी विद्यालयातील मुलांनी दहीहंडी फोडली.

              श्रीकृष्णाची माहिती बिस्मिल्ला तांबोळी यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व प्राथमिकच्या सहशिक्षिका उज्वला झपके व आभार इंग्लिश मिडीयम च्या सहशिक्षिका भाग्यश्री सलगरे मॅडम यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages