कोळा येथे नुतन सहाय्यक अभियंता राजेंद्र बोराडे यांचा सत्कार संपन्न... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 8, 2022

कोळा येथे नुतन सहाय्यक अभियंता राजेंद्र बोराडे यांचा सत्कार संपन्न...

कोळा येथे नुतन सहाय्यक अभियंता राजेंद्र बोराडे यांचा सत्कार संपन्न...

श्री बोराडे यांचे कोळा जनतेतून ग्रामस्थातून स्वागत

                सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला तालुक्यातील कोळा विभागासाठी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या कोळा वीज बोर्ड सब स्टेशनला सहाय्यक अभियंता पदी लोणविरे गावचे सुपुत्र राजेंद्र शंकर बोराडे यांची  शासनाच्या वतीने अधिकृत नियुक्ती नेमणुक करण्यात आली आहे बोराडे यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे कोळा सबस्टेशनच्या सहाय्यक अभियंता पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण स्टॉप व कर्मचारी च्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला सर्व कर्मचारी स्टॉप उपस्थित होता.

                नूतन सहाय्यक अभियंता राजेंद्र बोराडे हे गेले अनेक दिवस सांगोला महावितरण ऑफिसमध्ये व कोळा गावच्या प्रभारी म्हणून काम पहात होते त्यांना पदोन्नती मिळाल्याने बारामती डिव्हिजनवरून महावितरण कडून अधिकृतरित्या कोळा सब स्टेशनचा सहाय्यक अभियंता पदाचा चार्ज देण्यात आला आहे व कामावर रुजू झाले आपल्या चांगल्या कामाच्या पद्धतीमुळे जनतेमध्ये नावलौकिक मिळवला आहे कोणतेही काम असो लाईट वीजपुरवठा खंडित झाला तर स्वतः साइटवर जाऊन वायरमन व स्टॉप सोबत थांबून काम करून घेणे वायरमनच्या कायमच पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा त्यांना चालत नाही वीज ग्राहकांचे कामाला पहिलं प्राधान्य असा  हातखंडा राहिला आहे. वीज ग्राहकांना अडचणी संदर्भात दिलेला शब्द पूर्ण करणे आपल्या कामाचे वेळेचे नियोजन  अखंडपणे राबवणे सर्वांना सोबत घेऊन जाणे कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात ग्राउंड वर काम करण्याची त्यांची हातोडी सर्वश्रुत आहे. यामुळे लाईटचा प्रोब्लेम विसरा अन्  बोराडे साहेबांना थेट कॉल करा असे वातावरण ग्रामस्थांमध्ये निर्माण झाले आहे.

                कोळा सब स्टेशन अंतर्गत कोळा कराडवाडी कोंबडवाडी किडबिसरी डोंगर पाचेगाव तिप्पेहाळी  जुनोनी काळुबाळूवाडी जुजारपूर हटकर मंगेवाडी, गौडवाडी बुधेहाळ सोमेवाडी  या गावांच्या जनतेच्या लाईट व विजे बाबत अडचणी श्री बोराडे पाहणार आहेत.

                या सत्कार कार्यक्रमास पत्रकार जगदिश कुलकर्णी युवक नेते हरिभाऊ सरगर,दशरथ मदने, सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे कोळा सबस्टेशनचे  ऑपरेटर अभिजीत पाटील, अर्जुन पोरे, अमित मोहिते जुनोनी सब स्टेशनचे  युवराज शिंदे शरद बोराडे स्वानंद देशमुख अण्णा इंगोले सुरेश कोळेकर मंगेश झूमनाके महेश पाटील दादासो माळी

                वायरमन बाळू होनमाने, साहेबराव मिसाळ, सचिन माने, सुभाष जाधव, योगेश बावधने,प्रकाश पत्तेवाल, अण्णा आलदर, चैतन्य सूर्यवंशी, विनायक होनमाने,सागर खटके,विशाल खटके बापू श्रीराम विकास कुंभार अनिकेत पोरे यांच्यासह मान्यवर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक ऑपरेटर अभिजीत पाटील आभार अर्जुन पोरे यांनी मांनले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages