आदर्श च्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना पाठवल्या राख्या.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 8, 2022

आदर्श च्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना पाठवल्या राख्या.!

आदर्श च्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना पाठवल्या राख्या.!

प्रधानमंत्री मोदीजीना ही दिल्या शुभेच्छा.!

              कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी संचलित,आदर्श पब्लिक स्कूल,ज्युनियर सायन्स कॉलेज व सीबीएसई स्कूल कुर्डूवाडी येथील  विद्यार्थ्यांनी  देशाच्या सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांना राख्या पाठवल्या व अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छापत्र पाठवले.

              सदर उपक्रमामध्ये पहिली ते बारावीच्या २१०० विद्यार्थ्यांनी ३२०० राख्या तयार केल्या.तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये लोकर,मनी मोती,कार्डशीट,सुई दोरा,डिझाईन टिकल्या,लेस,कुंदन,फेविकॉल, इत्यादी साहित्याच्या माध्यमातून रंगीबेरंगी राख्या तयार करण्यात आल्या.या कामी विद्यार्थ्यांना पालकांचेही सहकार्य लाभले.देशाच्या सैनिका प्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

              सदर राख्या आर्मी,नेव्ही, व एअरफोर्स च्या सैनिकांना कुर्डूवाडीच्या पोस्ट ऑफिस मधून पाठवण्यात आल्या.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या 'हर घर तिरंगा,घर घर तिरंगा' या उपक्रमाचे स्वागत करीत आदर्श स्कूलच्या सोळाशे विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छापत्रे पाठवली.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे व संस्थेच्या प्रकल्प संचालिका सौ.पूजा सुरवसे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

              या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे देशप्रेम जागृत होण्यास मदत झाली. आपली राखी सैनिकांपर्यंत पोहोचते आहे याचा मनस्वी आनंद होता. सदर उपक्रमासाठी कलाशिक्षक राहुल चंदनकर,प्रशांत चोपडे,मंगेश लचके यांनी परिश्रम घेतले.यासाठी मुख्याध्यापिका शकीलाबी सय्यद,प्राथमिक विभाग प्रमुख आयशा मुलाणी,सीबीएससीचे प्राचार्य विजयकुमार लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages