शिवसेना खासदार संजय राऊतांना ४ दिवसांची कोठडी

मुंबई, (नासिकेत पानसरे):- शिवसेना खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने ४ आगस्ट पर्यंत कोठडी दिल्याने त्यांना दिवस ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे.पत्राचाळ अर्थिक घोटाळ्या प्रकरणी काल रविवारी त्यांची १६ तास चौकशी नंतर रात्री उशिरा अटक केली.
कोर्टात युक्तीवाद करताना ईडीनं संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी मागितली. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी म्हटलं, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी एक रुपयाचीही गुंतवणूक केलेली नाही. पण त्यांना ११२ कोटी रुपये मिळाले. चौकशीतून हे समोर आलं आहे की, यांपैकी १.६ कोटी रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले.
या पैशांतून संजय राऊत यांनी अलिबागमधील किहिम बीचवर एक भूखंड विकत घेतला होता. हा भूखंड स्वप्ना पाटकर यांच्या नावे घेण्यात आला, तसेच प्रवीण राऊत हेच संजय राऊत यांच्यावतीनं व्यवहार करत होते. या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना चार वेळा समन्स बजावण्यात आलं पण ते यांपैकी फक्त एकदाच ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. याकाळात त्यांनी महत्वाचे साक्षीदार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या प्रकरणी सखोल चौकशीसाठी संजय राऊत यांना ८ दिवसांची कोठडी देण्यात यावी.असा युक्तीवाद ईडीच्या वकिलांनी केला.
संजय राऊत यांच्यावतीन वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद करताना म्हटलं, संजय राऊतांची अटक ही राजकीय हेतून झाली आहे. त्यांना हृदयासंदर्भात आजार आहे, त्यांच्यावर यासंबंधी शस्त्रक्रिया देखील झालेली आहे. यांसंबंधीची कागदपत्रे यापू्र्वीच कोर्टात सादर करण्यात आली आहेत. त्यामुळं जर संजय राऊत यांना कोठडी द्यायची असेल तर कमीत कमी दिवसांसाठी त्यांना कोठडी देण्यात यावी. त्यावर कोर्टाने मान्य केली.
संजय राऊत यांना घरचं जेवण, औषधांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राऊतांच्या वकीलांनाही सकाळच्या वेळेत त्यांना भेटता येणार आहे. तर रात्री साडे दहानंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नसल्याचं ईडीनं कोर्टाला सांगितलं.
No comments:
Post a Comment