कुर्डूवाडीत प्रथमच सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन : मेंदूरोग तज्ञ डॉ.आनंद मुदकण्णा

मावळा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम : धनराज शिंदे
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):– सोलापूर येथील स्पर्श न्यूरो व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल च्या सर्वरोग तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मावळा प्रतिष्ठानच्या वतीने कुर्डूवाडीत प्रथमच मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये ए.सी.जी, मेंदू रोग,अस्थिरोग,लिव्हर,हाडाचा ठिसुळ पणा,रक्तदाब,मधुमेहसह विविध अश्या सर्व तपासण्यासह उपचारार्थीना औषधे मोफत देण्यात आली.
यामध्ये महिला,बालके,तरुण ज्येष्ठांन सह नागरिकांनी उपचारासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला,हे शिबिर मावळा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन मेंदूरोग तज्ञ डॉ.आनंद मुदकण्णा,सीईओ डॉ.संतोषी मुदकण्णा,माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठलगंगा चे चेअरमन धनराज शिंदे,विठ्ठल कॉर्पोरेशन चे कार्यकारी संचालक व निमगावचे सरपंच यशवंत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कुर्डूवाडी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी न्यूरो सर्जन डॉ.विजय जोशी,मेंदूरोग तज्ञ डॉ.निखील नवले,अस्थिरोग तज्ञ डॉ.गुड्डू बबलादी,जनरल फिजिशियन डॉ.मनोज कोरे,पोट विकार व लिव्हर तज्ञ डॉ.स्वप्नील वाळके,अतिदक्षता विभाग तज्ञ डॉ.दत्तात्रय सर्जे, आदींसह अनुभवी तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
No comments:
Post a Comment