लाखो भाविक चंद्रभागेच्या पवित्र स्नानापासून वंचित

चंद्रभागे स्नान हेची मागे दान
संतांच्या वचनाचा वारकरी सांप्रदायाला पडला विसर ; हिंदुत्ववादी सरकार गप्प?
किर्लोस्कर डिझेल इंजिन लावून भाविकांच्या स्नानाची व्यवस्था करा- दत्तात्रय बडवे-शिंदे
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे सध्या पंढरपूरवर महापुराचे संकट ओढावले आहे. यामुळे भाविकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीमध्ये जाण्यापासून थांबविण्यासाठी बॅरेकेटींग लावले आहेत. यामुळे भाविक व स्थानिक नागरिक श्रावण महिना व चातुर्मासाचा कालावधी सुरू असताना चंद्रभागा स्नानापासून वंचित राहत आहेत. याबाबत हिंदुत्ववादी सरकारही गप्प का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. परंतू नदीतून डिझेल इंजिनने पाणी उचलून बॅरेकेटींगच्या आत घाटाच्यावरच्या बाजूस भाविकांना चंद्रभागेच्या पवित्र स्नानाची व्यवस्था करावी. हरिद्वार, काशी, वाराणसी, मथुरा या ठिकाणी गंगा, यमुना नदीला महापुर येतो तरीदेखील त्याठिकाणी भाविकांच्या स्नानाची सोय केली जाते. याचा अभ्यास करून त्या ठिकाणच्या प्रमाणे त्याच धर्तीवर पंढरपुरात घाटजोड बांधणी केली आहे परंतू भाविकांच्या स्नानाला बॅरेकेटींग लावून प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे तमाम हिंदू भाविक वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाविक व स्थानिक नागरिकांतून घाटाच्या वरच्या बाजूस डिझेल इंजिनच्या माध्यमातून पाणी उपसा करून स्नानाची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे. त्यातच हिंदूंचा श्रावण हा पवित्र महिना चालू असून लाखो भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येत आहेत परंतू स्नानापासून वंचित राहत आहेत. आता मंदिरात सरकारचे प्रशासन आहे त्यात सुमारे 11 महाराज मंडळी आहेत त्यांनी तरी याचा विचार करायला हवा होता परंतू ते वरील प्रकारावरून मागणी न केल्यामुळे प्रशासनासमोर हतबल झाले असल्याचे दिसून येते. तरी मंदिर प्रशासन, नगरपालिका प्रशासन व महसूल विभागावर एकच व्यक्ती अधिकारी म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांनी तिन्ही संस्थेचा समन्वय साधून नदीच्या घाटावर किर्लोस्कर डिझेल इंजिन लावून तुळजापूरच्या गोमुखाच्या धर्तीवर नदीतून पाणी उचलून भाविकांना स्नानाची व्यवस्था करावी व भाविकांच्या श्रध्देचा विचार करावा अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे- शिंदे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीमंत कृपासागर सुशिलकुमार शिंदे सोा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोा, आ.प्रणितीताई शिंदे खा.डॉ.श्रीकांत शिंदे सोा, आ.शहाजीबापू पाटील, विभागीय आयुक्त सो पुणे व पंढरपूर वारकरी सांप्रदाय महाराज मंडळी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment