शहर युवक काँग्रेसच्या वतीने काळेवाडी येथे सफाई कर्मचारी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण
.jpg)
.jpg)
.jpg)
रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
पिंपरी (कटूसत्य वृत्त): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने काळेवाडी, विजयनगर येथे आशा राजगुरू या सफाई कर्मचारी महिला भगिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सफाई कर्मचारी महिला आशा राजगुरू, रामकली चव्हाण, शोभा शिरसाट यांना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सज्जी वर्की यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास करणसिंग गिल, सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, जिफिन जॉन्सन, अथर्व माने, रोहित भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी युनिव्हर्सल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. रणविजय सिंग व इतर तज्ञ डॉक्टर व कर्मचारी यांनी उपस्थित नागरिकांची तपासणी केली. यामध्ये कान, नाक, घसा, हृदय रोग, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडा, मूळव्याध, मोतीबिंदू, अस्थिरोग, स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. याचा शंभर पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. ५८ नागरिकांनी रक्तदान केले. स्वागत चंद्रशेखर जाधव, सूत्रसंचालन विशाल कसबे तर आभार जमीर शेख यांनी मानले.
No comments:
Post a Comment