राजन पाटील हेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा - अजित पवार

मुंबई (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व माजी आमदार राजन पाटील यांच्या कडेच राहणार असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुबंई येथे झालेल्या बैठकीत सांगितले.
या बैठकीत बोलताना अजितदादांनी स्पष्ट सांगितले की, मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार राजन पाटील व आ. यशवंत माने यांच्या कडेच रहील इतरांनी चालू केलेली लुडबुड त्वरित बंद करावी. असा सज्जड दम ही अजितदादांनी दिल्याचे समजले.
मुबंई येथे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगालात झालेल्या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार राजन पाटील, आ. यशवंत माने उपस्थित होते
सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यात मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय वादंगावार आज मुबंई येथे अखेर पडदा पडला असून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष मा जयंतराव पाटील,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. यामध्ये सोलापूर जिल्हाची सर्वस्वी जबाबदारी तसेच आगामी निवडणुकांमध्ये घेण्याची सर्व निर्णय हे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या कडेच राहतील तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही माजी आमदार राजन पाटील व आ. यशवंत माने यांच्या कडेच राहतील असे बैठकीत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी आमदार राजनजी पाटील,आ. यशवंत माने यांना दिली.
No comments:
Post a Comment