पंढरपूरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 10, 2022

पंढरपूरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

पंढरपूरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव



‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली

रॅलीत विद्यार्थ्यासह ,पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, समाजिक संस्थाचा उत्स्फूर्त  सहभाग

विद्यार्थ्यांसह सुमारे 8 हजार 500 जणांचा सहभाग

               पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत  घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी  सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच  शहरात तसेच तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज  फडकवावा यासाठी विविध शासकीय कार्यलय, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था तसेच पदाधिकारी  यांच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली.

               या रॅलीत आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, डॉ.बी.पी.रोंगे तसेच माजी नगरसेवक, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनाचे  सदस्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्योने  सहभागी झाले होते.

               रॅलीत 350 फुटांचा तिरंगा ध्वज हातात घेवून  विद्यार्थ्यांनी तसेच सहभागी अधिकारी व पदाधिकारी यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. पंढरी नगरी ,झांज पथकासह टाळ मृदुंगाच्या गजरात भारत माता की जय, वंदे मातरम यांनी दुमदुमून निघाली. शहरात विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीत तसेच पुष्पवृष्टी करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील वातावरण चैतन्यमय झालेले पहावयास मिळाले. रॅलीमध्ये तालुक्यातील  विविध शैक्षणिक संस्थेच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच  महसूल, पोलीस, कृषी, पंचायत समिती, महावितरण आदी विभागाच्या एक हजार शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी तर पदाधिकारी,  विविध समाजिक संघटनाचे पदाधिकारी, नागरिक  अशा 2500  जणांनी सहभाग घेतला होता.  रॅलीत विद्यार्थ्यांसह सुमारे 8 हजार 500 जणांनी  सहभाग घेतला होता. 

               डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली छत्रपती शिवाजी चौक, भादुले चौक, नाथ चौक, महाव्दार चौक, कालिका देवी चौक मार्गे येवून छत्रपती शिवाजी चौक येथे समारोप करण्यात आला.  समारोपप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी  तालुक्यातील सर्व नागरिकांनी  दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपल्या घरांवर  तिरंगा ध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात  सहभागी व्हावे असे, आवाहन करण्यात आले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages