सह्याद्री फार्मसीचे प्रा.औदुंबर माळी हे आंतराष्ट्रीय उत्कृष्ठ संशोधक पुरस्काराने सन्मानित

सांगोला :-(कटुसत्य वृत्त) सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे या महाविद्यालयात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या तसेच प्राध्यापकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात,त्यामुळे सर्वाना त्याचा फायदा होताना दिसत आहे .महाविद्यालयाचे प्रा.औदुंबर माळी याना आंतराष्ट्रीय उत्कृष्ठ संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्ही.डी.गुड प्रोफेशनल असोसिएशन, चेन्नई हि संस्था आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर् अभियांत्रीकी,फार्मसी,विज्ञान व वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ठ संशोधकास पुरस्काराने सन्मानित करते अशा या संस्थेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रा.औदुंबर माळी सरानी फार्मसी क्षेत्रातील विविध विषयावर संशोधन केले आहे त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करून सत्कार केला तसेच भविष्याच्या वाटचालीस शुभेछ्या दिल्या. महाविद्यालयात उपलभद्ध असणारे अनुभवी प्राध्यापक, अद्यावत उपकरणे, सुसज्य ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळां व केमिकल्स यांची उपलब्धता, अभ्यासमय परिसर, वेळोवेळी महाविद्यालयाने आयोजित केलेले वर्कशॉप, सेमिनार, गेस्ट लेक्चर, कॉन्फरन्स यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त होण्यास मदत झाली असे मत त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment