शिवसेनेकडून निवड जाहिर होताच शरद कोळी राज्यव्यापी दौऱ्यावर

घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी नुक्ताच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे, त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवली नसताना रविवारी शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत हे सोलापुर दौर्यावर आले असता त्यांनी सांगोला येथिल निर्धार मेळाव्यात शरद कोळी यांच्यावर्ती फार मोठी जबाबदारी देवून गेले आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शरद कोळी यांची युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक पदी निवड केली आहे.
शरद कोळी यांच्यावर्ती शिवसेना पक्षाने फार मोठी जबाबदारी सोपविल्याने त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली असुन आपन शिवसेना पक्षाच्या विस्तारासाठी उद्धवजी ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभर फिरुन पक्ष विस्तारासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून समस्या जानून घेनार असल्याचे त्यांनी सांगीतले.
लगेच सध्या त्यांनी लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचा दौरा सुरु केला असुन ठीक ठिकानी त्यांचे स्वागत केले जात आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी करून आम्ही शरद दादा कोळी यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे असुन दादांनी शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदार खासदारांना धडा शिकवावा असे कार्यकार्ते सांगत आहेत.
No comments:
Post a Comment