सांगोला तहसील कार्यालयावरील तिरंगा यामध्ये अशोकचक्र समाविष्ट करावे - सुरजदादा बनसोडे
.jpg)
सुरजदादा बनसोडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी जिल्हाधिकारी यांचे तहसीलदार यांना तातडीचे आदेश
सांगोला (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा लावण्यासाठी प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार सर्वत्र तिरंगा ध्वज फडकून अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मात्र सांगोला तहसील कार्यालयावरील तिरंगा यामधील अशोकचक्र गायब झाल्याने सदर तिरंगा यामध्ये दुरुस्ती करावी, अशी आक्रमक मागणी आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी थेट जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली. सदर मागणीवरून जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सबंध देशभरात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये सर्वजण सहभागी झाले. आणि घरोघरी तिरंगा ध्वज फडकावून मानवंदना दिली. दरम्यान तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर तिरंगा लावण्यात आला परंतु यामध्ये अशोक चक्र नसल्याने या संबंधित दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांच्याकडे सोपवण्यात आले. सदर मागणीवरून तहसीलदार अभिजित पाटील यांना कमानीवरील डिजिटल तिरंग्यात अशोकचक्र समाविष्ट करण्यास तातडीचा आदेश दिला आहेत. सदरचे निवेदन आर पी आय ( आठवले ) तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या वतीने व पश्चिम महाराष्ट्र संघटक अरुणआण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तसेच राजस्थान मधील जालोर जिल्ह्यात सुराणा गावातील इंद्र मेघवाल या 9 वर्षीय दलित शालेय विद्यार्थ्यास त्याच खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांनी त्याच्या वैयक्तिक पाण्याच्या मडक्यातून तो विद्यार्थी पाणी का प्याला?म्हणून जातीय द्वेशातून त्याला अमानुष मारहाण करून त्याचा बळी घेतला. सदरचा प्रकार हा स्वातंत्र्य भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना घडणे म्हणजे लोकशाहीसाठी लाजिरवाणी अतिशय निंदनीय व दुःखद घटना आहे. दलितांवरील वाढते अन्याय पाहून शासनाने दलिता वरील अत्याचारा विरोधात कठोर नियम लागू करावेत. तरी या घटनेतील आरोपीस सरकारने फाशीची शिक्षा द्यावी व या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटातर्फे जाहीर निषेध करण्यात येणार आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे आरपीआय तालुका अध्यक्ष सुरज दादा बनसोडे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment