'माझ्या परिघात सेवा' नाविन्यपूर्ण संघटनेची वृक्षारोपण करून औपचारिक स्थापना

सांगोला (कटुसत्य वृत्त): प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र येऊन एका नावीन्यपूर्ण संघटनेची स्थापना काल कुलाळवाडी तालुका जत येथे करण्यात आली.
डॉक्टर, वकील, शिक्षक ,सीए, समाजसेवक, पत्रकार, चित्रकार, फोटोग्राफर, वार्ताहर, पोलीस, वकील, शेतकरी, गृहिणी,अधिकारी अशा विविध क्षेत्रातील लोक ज्यांनी आपलं जीवन समाजसेवेसाठी समर्पित करण्याचा संकल्प केला आहे व ज्या लोकांना रंजलेल्या गांजलेल्या व्यक्तींना मदत करायची इच्छा आहे अशा व्यक्तींनी ही संघटना स्थापन केली आहे.
ज्या त्या व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार आपल्या परिघामध्ये सेवा करत करत आपल्याला मिळालेला हा जन्म आनंदाने जगत रहावे व आपल्या आपल्या सभोवताली आनंद निर्माण करावा व दुःख कमी करावे हा दृष्टिकोन बाळगणे व याचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने हे संघटन स्थापन करण्यात आले.
यावेळी स्थापनेची आठवण म्हणून कुलाळवाडी येथे वटवृक्षाचे रोप लावण्यात आले. कुळालवाडी येथील जि. प.शाळेची ग्रीन आर्मी उपस्थित होती ,त्याचबरोबर संस्थापक सदस्य
श्री.भक्तराज गर्जे, श्री.राहुल जाधव,श्री.अमोल गायकवाड, श्री.अतुल वाघमोडे उपस्थित होते.शेवटी चर्चासत्र झाले,यात बाकीचे सर्व संस्थापक सदस्य- शर्वरी फडे, संजय गव्हाणे, राजेंद्र वाघमारे, लक्ष्मण जाधव, सचिन गायकवाड, अण्णासो परमाळे ,नंदकुमार गव्हाणे ,ओंकार कुलकर्णी, विशाल बडके, रियाज आतार, राहुल माने, सचिन सरगर, समाधान केदार ,सुजाता आलदर,सुजाता गायकवाड वंदना पाटील,स्वाती म्हेत्रे गुगल मीट च्या माध्यमातून सहभागी झाले.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक श्री सुधिर गायकवाड यांनी सेवेचा दृष्टिकोन एक लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
No comments:
Post a Comment