डॉ. बी.आर. आंबेडकर नॅशनल एक्सलेंस पुरस्कार यशपाल लोंढे यांना प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 20, 2022

डॉ. बी.आर. आंबेडकर नॅशनल एक्सलेंस पुरस्कार यशपाल लोंढे यांना प्रदान

डॉ. बी.आर. आंबेडकर नॅशनल एक्सलेंस पुरस्कार यशपाल लोंढे यांना प्रदान

               टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये १२ ऑगस्ट रोजी नॅशनल युथ डे साजरा करण्यात आला. यावेळी मिझोरमचे माजी राज्यपाल अमोलक रत्तन कोहली, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

               डॉ विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन व नॅशनल युथ अवार्डीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत देण्यात येणारा डॉ. बी.आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्ड २०२२ हा पुरस्कार मिझोरमचे माजी राज्यपाल अमोलक रत्तन कोहली  व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते  सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रिपाइं(आ) चे युवानेते यशपाल चंद्रकांत लोंढे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल टेंभुर्णी व परिसरातील नागरिकांकडून यशपाल लोंढे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages