रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी जयवंत पोळ यांची निवड

टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये सदरची निवड करण्यात आली. ही बैठक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे संघटक सचिव तथा पंढरपूरचे नगरसेवक सुनील सर्वगोड, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा कुर्डूवाडीचे नगरसेवक बापूसाहेब जगताप, पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ मोहोळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे, यशपाल लोंढे यांच्यासह पुणे, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयवंत पोळ हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत असून ते टेंभुर्णीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी आहेत. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून व राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात आले. अनेकांनी झालेल्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment