सांगोल्यात भाजपच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन

सांगोला (कटुसत्य वृत्त): भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगोल्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी जुजारपुर विकास सेवा सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
जुजारपूर ता. सांगोला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत आणि भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी जूजारपुर विकास सेवा सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत, भाजपा युवा मोर्चा सांगोला तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, चेअरमन सुखदेव खडके, ग्रा.सदस्य सदस्य हणमंत हिप्परकर, रमेश पवार, संचालक किसन हिप्परकर, जीवन गाडे, यशवंत चौगुले, नाथ बजबळे, बापू हिप्परकर, निवृत्ती हिप्परकर, सरपंच फटू बजबळे, बजरंग बजबळे, दादासो माने, अप्पा हिप्परकर, भीमा खरात, नामदेव ढोणे, भाऊ हिप्परकर, रामा हिप्परकर, राहुल केदार, अजित तवते, दीपक केदार, प्रकाश हिप्परकर, बाळासो चव्हाण, अप्पा पवार, चंद्रकांत हिप्परकर, बाळू गाडे, विश्वास करडे, रामा करडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment