आ. शहाजीबापू पाटील यांचे खंदे समर्थक दादासाहेब लवटे यांची शिवसेना पक्षाच्या सांगोला तालुकाप्रमुख पदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 26, 2022

आ. शहाजीबापू पाटील यांचे खंदे समर्थक दादासाहेब लवटे यांची शिवसेना पक्षाच्या सांगोला तालुकाप्रमुख पदी निवड

आ. शहाजीबापू पाटील यांचे खंदे समर्थक दादासाहेब लवटे यांची शिवसेना पक्षाच्या सांगोला तालुकाप्रमुख पदी निवड

                  सांगोला (कटूसत्य वृत्त):- आ. शहाजीबापू पाटील यांचे खंदे समर्थक, युवक नेते दादासाहेब भगवान लवटे यांची शिवसेना पक्षाच्या सांगोला तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार  सदर निवडीचे पत्र आ. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते दादासाहेब भगवान लवटे यांना प्रदान करण्यात आले.

                  दादासाहेब लवटे हे सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचे शिवसेनेचे युवा नेतृत्व असून, त्यांच्या राजकारणाची सुरुवात 2014 साली आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांचे शिक्षण बीए डीएड झाले आहे. 2015 साली सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. सन 2017 साली पत्नी रूपाली दादासाहेब लवटे सांगोला पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आल्या. 2019 साली 14 गावांना पाणी मिळावे म्हणून बेमुदत मतदानावर बहिष्काराचे आंदोलन दादासाहेब लवटे यांनी यशस्वीपणे पार पाडले. उजनी सांगोला उपसा सिंचन योजनेमध्ये आम. शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून या 14 गावांचा समावेश करण्यात आला. दादासाहेब लवटे यांनी शिवसेनेच्या अनेक सभा यशस्वी केल्या. दादासाहेब लवटे हे आम. शहाजीबापू पाटील यांचे विश्वासू सहकारी असून, अनेक ग्रामपंचायत असलेल्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका दादासाहेब लवटे यांनी निभावली आहे. तसेच पंचायत समिती सदस्य असताना दादासाहेब लवटे यांनी अनेक गोरगरीब सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. तसेच तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या जाती धर्माचा आहे याचा विचार न करता येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. गावातील नागरिकांच्या अनेक अडीअडचणी सोडवण्याचा तसेच त्यावर मात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आम. शहाजीबापू पाटील हाच आमचा पक्ष मानून त्यांनी आज पर्यंत शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याचेच फळ म्हणून आम. शहाजी बापू पाटील यांनी दादासाहेब लवटे यांच्यावर विश्वास ठेवून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दादासाहेब लवटे यांची सांगोला  शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर दादासाहेब लवटे हे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने व आ. शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष वाढीसाठी व शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages