विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे जेष्ठ नागरिक काशी यात्रेसाठी रवाना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 12, 2022

विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे जेष्ठ नागरिक काशी यात्रेसाठी रवाना

विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे जेष्ठ नागरिक काशी यात्रेसाठी रवाना


बबनदादा हे आमचे श्रावणबाळ - यात्रेकरुंचा अभीप्राय

               बेंबळे (कटुसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत प्रतिवर्षी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी यात्रेचे आयोजन केले जात असून शुक्रवार दि.12 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वा. कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन येथून 300 यात्रेकरूंची ट्रीप काशी-वाराणसीकडे रवाना झाली. यात्रेकरूंना शुभेच्छा देणेसाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक सुरेश बागल, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव व टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सचे विठ्ठल पाटील व तानाजी गोंदील, कामगार प्रतिनिधी अनिल वीर, हेडक्लार्क बी.एम.मुलाणी हे कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते.

               प्रति वर्षी खा.शरदचंद्रची पवार यांचे वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी यात्रेचे आयोजन करण्यात येते.आजअखेर 16 हजार जेष्ठ नागरिकांनी काशी यात्रेचा लाभ घेतलेला आहे. यात्रेकरूंना शुभेच्छा देताना व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे म्हणाले की संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी मोफत काशी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. मागील दोन वर्षामध्ये कोरोनाचे पार्श्वभुमीमुळे मोफत काशी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. आ.बबनराव शिंदे हे मोफत काशी यात्रेच्या माध्यमातून श्रावणबाळाची भुमिका पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यात्रेकरूंनी कारखाना स्वंयसेवकांना प्रवासामध्ये सहकार्य करून यात्रा यशस्वी व सुखरूप पार पडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच कारखान्याचे संचालक सुरेश बागल व कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे यांनी काशी यात्रेकरूंना प्रवासामध्ये घ्यावयाची दक्षता या बाबत मार्गदर्शन करून यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. आ.बबनराव शिंदे यांच्या या सामाजिक उपक्रमाची उपस्थित यात्रेकरूंनी प्रशंसा व कौतुक करून आ.बबनराव शिंदे हे आमचे श्रावणबाळ असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages