४० दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला आता खातेवाटप रखडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 12, 2022

४० दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला आता खातेवाटप रखडले

४० दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला आता खातेवाटप रखडले

              मुंबई, (नासिकेत पानसरे):- शिंदे फडणवीस सरकारचा ३९ दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला.पण आता मात्र खाते वाटप रखडले.भाजप-शिंदेगट दोघांनाही मलाईदार खाती मिळावित याकरीता अडून बसलेत का,अशा चर्चांना पेव फुटलय.

              खातेवाटप रखडण्याची दोन कारणं समोर आली आहे पहिलं कारण म्हणजे शिंदे गट आणि भाजप मध्ये ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच की काय खातेवाटप रखडलं अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही गटांना ऊर्जा आणि उद्योग ही दोन खाती हवीत. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून आग्रह सुरु आहे. यावर तोडगा निघेल तेव्हाच खातेवाटप मार्गी लागेल असं सांगितलं जात आहे.

              ऊर्जा आणि उद्योग खात्यांसाठी दोन्ही गटांत रस्सीखेच सुरु आहे. आता ४० दिवस विस्ताराचा तिढा सुूटता सुटत नव्हता तो कसातरी सुटला. आता खातेवाटपाचा तिढा आणखी किती दिवस रखडणार?जिल्हा पालकमंत्रीपदं सुद्धा कायम नाहीत परंतू येमाऱ्या स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन करण्याच्या दृष्टीने नियुक्त केले आहेत ते तरी कायम होतीस का असे सवाल उपस्थित होत आहे. तसेच ऊर्जा आणि उद्योग ही दोन महत्त्वाची खाती कुणाला मिळणार? कोण कसे जुळवून घेतं याकडेही आता लक्ष लागून आहे.

              पहिल्या विस्तारात रखडलेल्या यानंतर मंत्री म्हणून येणाऱ्यांना कोणते खाते द्यायचे यावरून घासाघीस सुरु आहे म्हणून वेळ लागतोय असेही बोलले जाते.विस्तार होऊन तीन दिवस चार दिवस होत आले.तरी मंत्र्यांना खाती मिळालेलीच नाहीत. मात्र हा खातेवाटपाचा तिढा लवकरच म्हणजे पुढील दोन दिवसात होईल असा विश्वास नवनिर्वाचित मंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे. जो काम करू शकेल अशांनाच मंत्रिपद दिल्याचं त्यांनी सांगितलं २० मंत्री आणि जास्त खाती यात मेळ कसा बसविणार यासर्व वाटाघाटी असल्यानं वाटपाला वेळ लागतोय. कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्यांना कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय,असं गावित यांनी सांगितलं.

ही असतील संभाव्य खाती, सूत्रांची माहिती

              १) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास) २) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ, ३) राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, सहकार, ४) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन, ५) चंद्रकांत पाटील - सार्वजनिक बांधकाम,६) विजय कुमार गावित- आदिवासी विकास,७) गिरीश महाजन - जलसंपदा, ८) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा,९) दादा भुसे- कृषी, १०) संजय राठोड- ग्राम विकास,११) सुरेश खाडे - सामाजिक न्याय,१२) संदीपान भुमरे- रोजगार हमी,१३) उदय सामंत - उद्योग १४) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री, १५) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण १६) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास,१७) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण,१८) अतुल सावे - आरोग्य,१९) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क २०) मंगलप्रभात लोढा - विधी न्याय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages