सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी प्रमाणपत्रे २२ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी प्रमाणपत्रे २२ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी प्रमाणपत्रे २२ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

               पुणे (कटुसत्य वृत्त):- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यासाठी ३० जुनपर्यंत अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्गाचे गुणपत्रक व चालू शैक्षणिक वर्षाच्या बोनाफाईड प्रमाणपत्राच्या प्रती २२ ऑगस्टपर्यंत सादर करायचे आहेत. 

               सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यासाठी यापुर्वी ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतू बहुतांश विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रवेश अर्जासोबत मागील वर्गाचे गुणपत्रक व चालू शैक्षणिक वर्षाच्या बोनाफाईड प्रमाणपत्राच्या प्रती जोडलेल्या नसल्यामुळे स्थानिक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निवड प्रक्रीया पुर्ण करता आली नाही.

               विहित प्रमाणपत्रांच्या प्रती २२ ऑगस्टपर्यंत सादर न केल्यास अर्ज निकाली काढण्यात येणार आहे. कागदपत्रे सादर केल्यानंतरच अर्जाचा विचार केला जाणार आहे. सर्व पालकांनी त्यांच्या पाल्यांचे परिपूर्ण अर्ज तसेच नवीन प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांनी देखील २२ ऑगस्टपर्यंत संबंधित वसतिगृहामध्ये सर्व कागदपत्रासह प्रवेश अर्ज सादर करावेत. प्रवेश प्रक्रिया वसतिगृहाच्या क्षमतेनुसार शैक्षणिक गुणवत्तेवर आधारीत आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजय पवार यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages