दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

                 पुणे (कटुसत्य वृत्त):  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

                 नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या कक्षात लिलाव करण्यात येईल.

                 दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

                 अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जासह पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या स्वाक्षांकित प्रतीसह जमा करावा.

                 एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पणे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages