सोलापूर जिल्हा कारागृहात "जीवन गाणे गातच जावे" कार्यक्रम संपन्न झाला
.jpeg)
.jpeg)
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- सोलापूर "जिल्हा कारागृहातील" कैद्यांसाठी दिनांक ११ ऑगस्ट रोजी, "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड यांनी दिली.
या कार्यक्रमातून समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही विविध कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गतच "स्वराज्य महोत्सव" निमीत्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर, थोर संत, जेष्ठ साहित्यीक व कवी, थोर महापुरुष यांच्या जीवनकार्यावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण राज्यभर करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या कैदयांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्व, प्रबोधन व समुपदेशन करणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता कारागृह अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कैदयांकरीता आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्रच्या लोककले सोबतच, कैदयांचे प्रबोधन, योगा चे महत्व, देशभक्ती भावना जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्याचा सांस्कृतिक विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी त्याप्रमाणे आज रोजी सोलापूर जिल्हा कारागृह येथे जीवन गाणे गातच जावे या कार्यक्रमांतर्गत सोलापूर येथील स्टार्स ऑफ मेलडी व सुरसंगम मंगळवेढा या ग्रुपच्या वतीने कारागृहातील सर्व कैद्याकरिता आजादी का अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर गीत गायनांचा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये कैदी बांधवांनी देखील देशभक्तीपर गीतांचे गायन केले तसेच पतंजली योग विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने देखील योगाचे महत्व व प्रात्यक्षिक दाखवून केद्यामध्ये जागृती केली.
या कार्यक्रमात जिल्हा कारागृहात असणाऱ्या कैदयांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी देण्यात आली. सदर कार्यक्रमास वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री भाऊसाहेब आगवणे तुरुंगाधिकारी श्री रोहित साळुंखे व तुरुंगाधिकारी श्री प्रदीप बाबर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात शासनातर्फे एकाच वेळी ३६ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कैदयाकरीता असा कार्यक्रम करण्याचा महाराष्ट्र तसेच देशातील हा पहिलाच अभिनव असा उपक्रम आहे.
No comments:
Post a Comment