नशामुक्ती भारत अभियानातंर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञाचे वाचन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 12, 2022

नशामुक्ती भारत अभियानातंर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञाचे वाचन

नशामुक्ती भारत अभियानातंर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञाचे वाचन


               सोलापूर (कटुसत्य वृत्त):- व्यसन व अंमली पदार्थापासून मुक्त करण्यासाठी केंद्र शासनामार्फत नशामुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र शासनामार्फत सदर योजनेची प्रभावी अमंलबजावणीसाठी आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा भाग म्हणून नशामुक्ती भारत अभियानातंर्गत सर्व युवक मुल, शैक्षणिक संस्था, महिला व समुदाय यांच्या सहकार्याने " अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार नशामुक्ती भारत अभियानातंर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा" सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथे दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आले.

               जिल्हा जात प्रमाणापत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी सचिन कवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “अंमली पदार्थ विरोधी " प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. सदर प्रतिज्ञामधून तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी नशामुक्त भारत अभियानात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. देशासमोरील हे आव्हान स्वीकारून आज आपण नशामुक्त भारत अभियानांतर्गत एकजूट होऊ आणि केवळ समाज, कुटुंब, मित्रच नव्हे तर आपण स्वतः ही नशामुक्त होऊया. कारण बदलाची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे अशी शपथ सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणापत्र पडताळणी समिती, तसेच समाज कल्याण अधिनस्थ सर्व शासकीय महामंडळामधील कर्मचारीयांना देण्यात आली.

               सदर नशामुक्ती भारत अभियानातंर्गत “अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा " कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुलोचना सोनावणे विशेष अधिकारी, शासकीय निवासी शाळा यांनी केले. तर प्रतिज्ञा वाचन श्री. राजेंद्र बुजाडे समाज कल्याण अधिकारी (विजाभज) यांनी केले. नशामुक्तीबाबत  जिल्हा जात प्रमाणापत्र पडताळणी समिती चे संशोधन अधिकारी सचिन कवले यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages