राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर १५ आगस्टपुर्वी होणार विस्तार

मुंबई, (नासिकेत पानसरे):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल गुरुवारी अचानक अस्वस्थता वाटू लागल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले सगळे कार्यक्रम रद्द करून तातडीने रवाना झाले. कदाचित मंत्रीमंडळाची ्अंतिम यादी निश्चित करून येतील असे वाटत असताना ईच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी फिरले.आता भाजपाचे वरीष्ठनेते सुधीर मुनगंटीवार यांच्या माहितीनुसार १५ तारखेपुर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल असे सांगण्यात येते.याला माजी मंत्री उदय सामंत यांनीही पृष्टी केली आहे.
काल मुख्यमंत्री शिंदे यांचे सर्व कार्यक्रम सर्वच प्रशासकीय बैठका आणि पूर्वनियोजित दौरेही रद्द करण्यात आले होते. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दौऱ्यावर दौरे सुरू दिल्लीवारी, राज्यात मेळावे आणि पूरग्रस्त भागांची पाहणी सुरूच होती. त्यातूनच ताण आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दुपारीच दिल्लीला रवाना झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. भाजपमधील काही ज्येष्ठांना बाजूला ठेवून नव्यांना संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. पण फडणवीस यांनी जुने - नवीन असे संतुलन ठेवा, असा आग्रह धरल्याची माहिती आहे.
५ तारखेला मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे ठामपणे सांगण्यात आले होते. परंतू आज राज्यात सत्तांतर होऊन ३५ दिवस झाले तरी अडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग निघत नाही.
शिवसेना या मुळ पक्षातील आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे निर्माण झालेल्या अनेक पेचप्रसंगाचा वाद आता सुप्रिम कोर्टात आहे बंडखोरांच्या पात्र अपात्रतेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे का, की शिंदे गटीतील ४० आणि अपक्ष १० अशा ५० आमदारांना कसे सामावून घ्यायचे यावर अजूनही तोडगा निघत नाही, म्हणून विस्तार लांबणीवर पडतोय का, आम्ही आमचं होतं ते सोडून तुमच्या सोबत आलो. जर आम्हाला आता इथं योग्य रीतीने सांभाळून घेत नसाल तर आम्ही आमच्या मुळ जागी परत जाऊन त्यांची माफी मागतो. असे तर काही आमदार म्हणत नसतील का, यासह इतर काही कारणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समोर ताणतनावाची परीस्थिती निर्माण झाली आहे का, अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे.
फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली बैठकीत भाजपची नावे अंतिम झाल्याचे समजते. तर दुसरीकडे शिंदे गटाला अधिक मंत्रिपदे आणि ठराविक खात्यांचा आग्रह आहे. त्यामुळे विस्तार लांबणीवर पडण्याचे महत्त्वाचे कारण असावे.
आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे हे मात्र खरे आहे.लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली होती बैठकीत काय झालं हे कळू शकले नाही मात्र त्या ४० आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे हे नक्की.
मुख्यमंत्र्यासह १६ बंडखोर आमदार जर अपात्र ठरले तर सरकारला धोका नाही, पण शिंदे मुख्यमंत्री राहतील का हा प्रश्न आहे. बंडखोर गटासह सरकार सत्तेवर येईल पण भाजपाचा मुख्यमंत्री होईल असे दिसते. जर त्या पुर्वी शिंदे गटाला जर नामुष्की टाळायची असेल तर त्यांना कोणत्यातरी राजकीय गटात किंवा पक्षात सामिल व्हावे लागेल त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येणार नाही. असे राजकीय विश्लेषक आणि कायदेतज्ञांचे मत आहे.
दरम्यान, येत्या ६ तारखेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे, मंत्रीमंडळ विस्तार आता सोमवार किंवा मंगळवारीच होईल, म्हणजेच १५ तारखेपुर्वी होईल असे दिसून येते. येत्या ८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय पेचावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता ८ ऑगस्टनंतरच विस्तार केला जाईल, अशी शक्यता आहे.
No comments:
Post a Comment