विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा विद्यार्थी युरोपमध्ये!
विद्यार्थ्यांनी आपल्या कोषातून बाहेर पडावे ; मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- युरोपियन देशात वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठी अवश्यक असणारी व केंब्रिज बाॅक्सहील लँग्वेज असेसमेंट ट्रस्ट द्वारे घेतल्या जाणाऱ्या ऑक्युपेंशनल इंग्लिश टेस्ट परीक्षेत शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते-पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडीकल रिसर्च इन्स्टिटय़ूटचा B.SC नर्सिंगचा विद्यार्थी अजित ढाकणे याने घवघवीत यश संपादन करत आयर्लंड या देशातील वैद्यकीय क्षेत्रात नर्सिंग ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे,महाविद्यालयाच्या B.sc नर्सिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या निरोप संमारंभ कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी त्याचे व त्यांच्या पालकांचा अभिनंदनपर सत्कार केला.
या कार्यक्रमा प्रंसगी संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,मी दोन-तीन वर्षांपूर्वी आपल्या महाविद्यालयाच्याच एका कार्यक्रमाप्रसंगी म्हणालो होतो "नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी , सरकारी नोकरीची मानसिकता बदलली पाहीजे जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठी संधी आणि सन्मान आहे विद्यार्थ्यांनी आपल्या कोषातून बाहेर पडून त्या संधीचा फायदा घेतला पाहीजे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी परदेशात गेले पाहीजे मी हे जे स्वप्न पाहीले त्याची सुरूवात होताना दिसत आहे या गोष्टीचा मनस्वी अभिमान वाटतो
आज एक विद्यार्थी परदेशात गेला उद्या हजार विद्यार्थी जातील,या करीता विद्यार्थ्यांना सर्वोत्तोपरी सहकार्याची भूमिका असेल.
आजपर्यंत महाविद्यालयातून १०१९ विद्यार्थी पास आऊट झाले आमच्या नर्सिंग महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे यातूनच नर्सिंगचे ९९ विद्यार्थी थेट महाराष्ट्र शासनात,देशातील प्रतिष्ठित केंद्रशासनाच्या AIMS इन्स्टिट्यूट मध्ये २ विद्यार्थी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत असे ही उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, संचालक प्रा.डाॅ.विश्वनाथ आवड, व्यवस्थापन अध्यक्ष पराग गायकवाड, शिवतीर्थ हिरेमठ, विराट गोरे,रूपाली वाळके, देवेंद्र वर्दम,जोत्सना कांबळे,पुजा चौरे,रूपाली कांबळे,विष्णुपंत शिंदे, प्रशांत पांचाळ ,अलविन काळे,अलिशा पारकर ,सनम शेख,सुप्रिया चिंतामणी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
हे माझ्य भाग्य आहे की मी, या काॅलजेचा विद्यार्थी आहे,संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,मार्गदर्शक शिक्षक या सर्वाच्या प्रोत्साहन दिल्याने नवनवीन गोष्टी करू शकल्याने
हे यश प्राप्त करू शकलो.
अजित ढाकणे,
विद्यार्थी, B.sc नर्सिंग

No comments:
Post a Comment