महापुरूषाने पाय ठेवला की हजारोंचे स्मारक पण विठ्ठलमुर्ती संरक्षण विहीरीकडे शासनाचे दुर्लक्ष

महाडच्या चवदार तळ्याप्रमाणे ऐतिहासिक विहीरीचा विकास करा
नवी मुंबईप्रमाणे नवे पंढरपूर निर्माण करा-दत्तात्रय बडवे-शिंदे
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- भारतातील सर्वच पक्ष मतासाठी वीर सावरकर, डॉ.आंबेडकर, महात्मा फुले, साने गुरूजी, महात्मा गांधी अशा थोर महापुरूषांनी क्रांती करताना भारतातील ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले, भेट दिली त्या ठिकाणी शासनाने हजारो कोटी रूपये खर्च करून त्यांचे स्मारक बांधले तर काही ठिकाणी बांधकाम चालू आहे. परंतू मुर्तीभंजक औरंगजेब याने इसवी सन 1695 मध्ये विठ्ठल मुर्ती भंग करण्याच्या दृष्टीने आल्यानंतर ती मुर्ती थोर संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी देगावचे विठ्ठलभक्त सुर्याजी पाटील यांच्या विहीरीत मुर्तीचे राजोपचार करण्यासाठी त्यांच्याकडे ठेवून त्याचे संरक्षण करून त्या ठिकाणी विहीरीतील पाण्यातून स्नान घालून मुर्तीची पुजा चालू ठेवली होती. सध्या बडवे समाजाचे प्रतिनिधी म्हणून ह.भ.प.शिवभक्त अनिलराव बडवे हे सेवा करत आहेत. अशा विठुरायाची सेवा केलेल्या ठिकाणी विकास करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करून शासनाच्यावतीने महाडच्या चवदार तळ्याप्रमाणे विकास करण्यासाठी 50 कोटी रूपयांची मागणी करावी. तसे त्यांनी न केल्यास महाराष्ट्र सरकारने सदरच्या विहीरीचे अधिग्रहण करून महापुरूषांच्या स्थळाप्रमाणे हजारो कोटी रूपये देवून संबंधित स्थळाचा विकास करावा. त्यामध्ये त्या ठिकाणी श्री विठ्ठलाचे मंदिर बांधून श्री विठ्ठल व संत भेटीचा देखावा बनविण्यात यावा.
तसेच नदीपलिकडील आढीव, भटुंबरे,शेगाव, देगाव, विसावा, नारायणचिंचोली व परिसरातील गावांना एकत्रित करून नवी मुंबईच्या धर्तीवर नवे पंढरपूर निर्माण करावे. कारण सदर भागात अनेक मठ असून 65 एकर परिसरात 1 हजार दिंड्या, हरे कृष्ण मंदिर, गीता मंदिर तसेच 65 एकराजवळील रेल्वेच्या 35 एकरात रेल्वे थांबा होणार असल्याचे समजते. तसेच विठ्ठल मुर्ती संरक्षण विहीरीचे पुरातन खात्यामध्ये नोंद करावी व ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटन खात्याने त्याचा विकास करावा अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रति मा.पंतप्रधान सोा, भारत सरकार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीमंत कृपासागर सुशिलकुमार शिंदे सोा व खा.डॉ.श्रीकांत शिंदे सोा, व पंढरपूर वारकरी सांप्रदाय महाराज मंडळी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment