फुरसुंगी येथील दारूचे गोडावूनची भिंत फोडून चोरून नेलेले दारूचे बॉक्स - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

फुरसुंगी येथील दारूचे गोडावूनची भिंत फोडून चोरून नेलेले दारूचे बॉक्स

फुरसुंगी येथील दारूचे गोडावूनची भिंत फोडून चोरून नेलेले दारूचे बॉक्स 

                   लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त):- दिनांक - २६/०८/२०२२ तालुका (हवेली) आरोपी यांचेकडील ट्रक, पिक-अप या वाहनांसह एकुण ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त"

                   दि.०८/०८/२०२२ रोजी वाईन एन्टरप्रायझेज प्रा.लिमी.श्रीनाथ वेअर हाऊसिंग,पुणे-सासवड रोड,पुणे येथील गोडावुनचे पाठीमागील बाजुने भिंत फोडुन,गोडावुन मधील रॉयल स्टॅग, इंम्पेरीयल ब्ल्यु, ब्लेन्डर या कंपन्याचे दारूचे ३०२ बॉक्स २५,४३,२०३/- रू किचे घरफोडी चोरी करून नेले होते. तसेच गोडावुन मधील सीसीटीव्हीचा डिव्हीआर हा काढुन नेला असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. सदर बाबबत हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं.८९६/२०२२ भा.दं.वि.क ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                   तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी घटनास्थळी जावुन गुन्ह्याचे ठिकाणची पाहणी करता, फुरसुंगी गाव ठाण ते लोणी-काळभोर टोल नाका तसेच लोणी काळभोर टोल नाका ते पाटस टोल नाका परिसरातील तांत्रिक विश्लेषणा व्दारे माहिती काढुन,दिनांक ११/०८/२०२२ रोजी हडपसर पोलीस ठाणेतील तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, सुरज कुंभार, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर असे उस्मानाबाद भागातील कळंब,कन्हेरगाव,पांगरी,तेरखेडा, देवधानोरा,पारडी, तेरखेडा, पारधी फाटा या भागात सदर आरोपींबाबत माहीती घेतली असता, सदरचा गुन्हा हा बिभीषण काळे व त्याचे साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले.

                   तपास पथकातील टिमने आरोपी नामे १)आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर,वय २६ वर्ष रा.मु.पो. उकडगाव,ता.बार्शी,जि.सोलापूर २)सागर ऊर्फ दाद्या शिवाजी मस्तुद,वय २८ वर्ष,रा. मु.पो.पांगरी,ता.बार्शी जि. सोलापूर ३)तानाजी भागवत चौघुले,वय ३८ वर्ष,रा.मु.पो.पारडी,ता.बार्शी जि.सोलापुर यांना ताब्यात घेवुन,त्यांचेकडे गुन्हया बाबत अधिक चौकशी केली असता,त्यांनी फुरसुंगी येथील दारूचे गोडावुनची भिंत फोडुन,रस्त्याचे बाजुला असणा-या भिंतीलगत ट्रक लावुन,दारूचे बॉक्स घेवुन गेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी कन्हेरवाडी आणि आंदोरा या दोन्ही गावांच्या ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेले दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

                   सदर आरोपींकडून आतापर्यंत ४९,२६,००८/- रू किचा माल जप्त केला असुन,त्यामध्ये ९,२६,००८/- रू किचे दारूचे ११० बॉक्स,त्यामध्ये इंम्पेरिअल ब्ल्यु आणि रॉयल स्टॅगची दारू तसेच गुन्ह्याकरीता वापर झालेला ट्रक व महिंद्रा पिक-अप हे वाहन जप्त करण्यात आले आहे.

                   गुन्ह्यातील पाहीजे आरोपी बिभीषण काळे हा उस्मानाबाद येथील पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून,त्याचे विरूध्द चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खुन, सरकारी नोकरावर हल्ला असे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत आरोपी यांचा शोध चालु असून,त्यांचेकडून अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

                   सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे व श्रीमती.नम्रता पाटील,पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-५,पुणे शहर यांचे मागदर्शनाखाली श्री.बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग,पुणे, श्री.अरविंद गोकुळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर, श्री.दिगंगर शिंदे व श्री. विश्वास डगळे पोलीस निरीक्षक,(गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक,विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक,अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages