सह्याद्री फार्मसीची भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न
.jpg)
सांगोला (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित साधून सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मेथवडे गावामध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील,यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर व विद्यार्थ्यांच्या नागरिकांच्या उपस्थितीत झाले.या तिरंगा रॅलीस विद्यार्थ्यांचा,पालकांचा,नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला व रॅली उत्साहात संपन्न झाली.भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे.हर घर तिरंगा,हर घर झेंडा या अभियानाअतर्गत नागरिकांमध्ये,विद्यार्थ्यांमध्ये जागृती,प्रसार व प्रचार करून सर्वानी घरावर,कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकावा हा संदेश देणे तसेच विविध सामाजिक सेवा उपक्रमाची माहिती व प्रसार करणे हा या रॅलीचा उद्देश होता.देशभक्तीपर घोषणा देत रॅलीने संपूर्ण गाव पिंजून काढला.तिरंगी झेंडे,संदेश फलक,शिस्तीत घोषणा देत जाणारी विदयार्थ्यांची रांग सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते.डी.फार्म द्वितीय व बी.फार्म प्रथम व द्वितीय वर्ष्याच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य साठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक तसेच राष्ट्ररक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या महात्म्याचे संदेश देणारे,स्त्री-भ्रूण हत्याबंदी,वृक्षारोपण,नशाबंदी,परिसर स्वछता,पाण्याचे महत्व या विषयावरील प्रबोधनपर पथनाट्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.हि रॅली झाल्यानंतर महाविद्यालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.हि रॅली यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा.भारत गरंडे, डॉ.एम.जी.शिंदे व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व नागरिकांचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment