सांगोला विद्यामंदिर प्राथमिक आणि इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी घडविले देशभक्तीचे दर्शन

प्राथमिक आणि इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न
सांगोला (कटूसत्य) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला मध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.75 वा स्वातंत्र्य दिन दोन्हीही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि देशभक्तीचे प्रेम जागृत केले.
सदर ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्था अध्यक्ष पी.सी.झपके संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, प्राथमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक उदय बोत्रे,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे,पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी व्हटे,आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी ध्वजारोहण संस्थाध्यक्ष पी.सी झपके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी आमदार विकास रत्न स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय रंगभरण,वक्तृत्व, निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही या वेळी गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त" हर घर तिरंगा" हे अभियान शासन स्तरावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राबविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाची प्रशस्त इमारत अतिशय देखण्या स्वरूपात सजावट करुन विद्युत रोषणाईने चमकत होती, सदर शाळा सजावट पाहून उपस्थितांनी शाळेचे कौतुक केले.
इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली मधील मनस्वी विक्रम कदम या विद्यार्थिनींनी इंग्रजी मधून भारताच्या स्वातंत्र्याविषयी अतिशय प्रभावीपणे मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल शेख, समाधान शिंदे यांनी केले तर राष्ट्रगीत,ध्वजगीत माधवी घोगरे मॅडम यांनी सादर केले. सदर कार्यक्रमास दोन्ही माध्यमातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी,पालक आणि विद्यामंदिर परिवारावर प्रेम करणारी सर्व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment