न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

सांगोला (कटूसत्य) न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 15 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून 15 मिनिटांनी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांत दादा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने ध्वजास मानवंदना देण्यात आली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सौ सुरेखाताई देशमुख सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य माननीय डॉक्टर अनिकेत भैया देशमुख, महाराष्ट्र राज्याचे पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य बबनराव जानकर, अवधूत कुमठेकर, प्राध्यापक अशोक शिंदे, प्राध्यापक दीपक खटकाळे, प्राध्यापक जयंत जानकर, विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रघुनाथ फुले सर, उपप्राचार्य विजय घाडगे सर, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दिनेश शिंदे सर न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य लक्ष्मण गावडे सर, उपमुख्याध्यापक रामभाऊ बेहेरे सर, उपप्राचार्य हेमंत आदलिंगे सर पर्यवेक्षक प्राध्यापक नामदेव कोळेकर, श्री राहुल मोरे सर, श्री दत्तात्रय पांचाळ सर, सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष राजगुर, तसेच सांगोला नगरीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी, संस्थेमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित होते. यानंतर पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
No comments:
Post a Comment