गावच्या प्रमुख मार्गासह,विद्यालयाच्या परीसराला दुर्गंधीने ग्रासले

नागरिकांच्या आरोग्याचा गाव प्रशासनाला पडला विसर
लऊळ (कटुसत्य वृत्त): येथील गावच्या प्रमुख मार्गावर गेल्या कित्येक दिवसापासून तुंबलेल्या गटारीमुळे गटाराचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी भररस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांसह विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. व्यवसायीक दृष्टीने उपयुक्त असल्याने गावात येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.याशिवाय बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेसह जिल्हा मध्यवर्ती बँक व दवाखाण्याची सुविधा असल्याने आसपासच्या गावातून येणाऱ्या लोकांना गावाच्या तोंडाशीच गटारगंगा वाहत असल्याने दुर्गंधीच्या घाण वासाने तोंडाला रुमाल लावून जावे लागते आहे.कोरोनासारख्या महाभयंकर महामरीतून अजून पूर्णतः जनता सावरलेली नाही.पावसामुळे साथीचे रोग झपाट्याने वाढत आहेत.रूग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने दवाखान्यात कमालीची गर्दी आहे.इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना गावप्रशासन मात्र गावकऱ्यांच्या आरोग्याला वाऱ्यावर सोडले आहे.गटारीमुळे झालेल्या दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याची होत असलेली हानी कधी थांबणार? समस्येचे समाधान कधी होणार?याकडे गावकऱ्यांबरोबरच पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष लागले आहे.
दवाखाने रुग्णांनी झाले फुल्ल...
गावातील सर्व दवाखाने साथीच्या रोगामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांनी अक्षरशः फुल्ल झाले आहेत.रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येते.डासांमुळे होणारा थंडीताप,खोकला अंगदुखीचे रुग्ण आढळून येत आहेत.
सरपंच प्रतिनिधिनी सांगितली जेसीबी व सफाई कामगार यांची अडचण...
याविषयी गावचे सरपंच प्रतिनिधी बोडके यांना फोन केला असता जेसीबी बाहेर कामाला गेले असल्याने मिळत नाहीत.सफाई कामगार यांचे नातेवाईक मयत झाल्याने सफाई कामगार कामावर आले नाहीत उद्या येतील असे सांगत वेळ मारून नेली.
No comments:
Post a Comment