गावा गावातील ग्रंथालय चालक जल्लोषात साजरा करणार स्वातंत्र्याचा आमृत महोत्सव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- "हर घर तिरंगा घरघर तिरंगा हर दिलमे तिरंगा " अशी नवीन घोषना खा. स्वामी यांनी दिली. आझादीचा अमृत महोत्सव साजरा करताना आनंद वाटत आहे. यापूर्वी रौप्य वर्ष, सुवर्ण वर्ष झाल्यावर ते कधी झाले हे कळाले देखील नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतातील सर्व नागरिक आनंदाने एकत्र आमृत महोत्सव दिवस साजरा करताना पहावयास मिळत असल्याचे मत खा. जय सिध्देश्वर स्वामी यांनी व्यक्त्त केले.
ते पुढे म्हणाले, हा कोणत्या धर्माचा उत्सव नाही. सर्व देशाचा हा उत्सव आहे. ग्रंथालयांना डी.पी.डी.सी. मधुन ई लायब्ररीसाठी निधी मंजूर करतो व लवकरच मुख्यमंत्री शिदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समावेत बैठक घेऊन अनुदान वाढीचा प्रश्न मार्गी लावू असे खात्रीशीर सांगितले.
रविवारी दि. ७ ऑगस्ट रोजी हुतात्मा मार्कडेय उद्यान अशोक चौक येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वंतत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हातील शासनमान्य ८५० सार्वजनीक ग्रंथालयाना मोफत "तिरंगा वाटप कार्यक्रम" प्रसंगी खा. स्वामी बोलत होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलीक मोरे, माजी अध्यक्ष जयंत आराध्ये, दैनिक कटूसत्यचे संपादक पांडूरंग सुरवसे, प्रा.भीमाशंकर बिराजदार, विजयकुमार पवार आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होत.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना जिल्हा ग्रंथालय आधिकारी जाधव म्हणाले की, स्वंतत्रयाचा आमृत महोत्सवानिमित्त प्रत्येकाच्या मनात देशप्रेम वाढीस लागावे. म्हणुन दि. १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत संस्थेच्या इमारतीवर व गावातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा. स्वंतत्र्यांचा गैरवशाली इतिहास सर्वाना सांगावे. सोलापूरला स्वातत्र्यांचा मोठा इतिहास आहे. तो येणाऱ्या पिढीला ज्ञात करून द्यावा असे अवाहन जाधव यांनी केले. जिल्हातील ११ ग्रंथालयाना प्रतिनिधीक स्वरूपात खा. शिवाचार्य स्वामी यांच्या हस्ते तिरंगा झेंडांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ग्रंथपालाना अतिशय तुटपुंजी पगार आहे. म्हणुन खा. स्वामी यांनी आपण स्वतः लक्ष घालून किमान तिप्पट अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या कडे प्रयत्न करावी. अशी मागणी केली. तसेच खासदार निधीतुन साहीत्य खरेदी साठी निधी द्यावा. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ येथे इ-ग्रंथालाय व अभ्यासिका निर्मितीसाठी निधी द्यावा अशी मागणी केली.
ग्रंथापाल सौ. संगीता कुमठेकर, सौ. वृषाली हजारे, सौ. सारीका माडीकर, मदन कुलकर्णी, दत्ताकुमार पोलके व ज्योतीराम चांगभले आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. बाळासाहेब चट्टे यांनी सुत्रसंचन केले. खासदार यांचे सचिव श्रीकांत माळगे यांचा सत्कार करण्यात आला. आभार जयंत आराध्ये यांनी मानले यावेळी जिल्हातुन बहुसंख्य ग्रंथपाल व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment