चिंतामणी विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

थेऊर (प्रविण शेंडगे):- चिंतामणी विद्या मंदिर थेऊर येथे शालेय आरोग्य तपासणी शिबिर सोमवार दिनांक 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट रोजी संपन्न झाले.या शिबिरामध्ये चिंतामणी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी , दुष्टी दोश , तिरळेपणा , जन्मजात विकार , सर्दी ,खोकला ,ताप ,पोट दुखी , अपचन ,इत्यादी आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र थेऊर येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर शिल्पा दलाल यांच्या सल्ल्याने 650 विद्यार्थी- विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली.
तसेच विद्यार्थांना प्राथमिक उपचार व औषध वाटप करण्यात आले आवश्यक मुलांना टॉनिक चे वाटप करण्यात आले. तसेच हिमोग्लोबिन गोळ्या चे हि वाटप करण्यात आले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी चे वैद्यकीय डॉ. मेहबुब लकडे, सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शिल्पा दलाल , आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार, आरोग्य सहायक सारिका भिसे , आशा वर्कर यांचे सहाय्य लाभले. तसेच चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य बि.डि. नेवाळे,विद्यालयाचे पर्यवेक्षक खरात, वाडकर, नजन, कंद, सूर्यवंशी,काटकर, काकडे, भरीत, पठाण, शिंदे, आदि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment