स्वतःच्या मर्जीतील ठेकेदरास कामे मिळावीत म्हणून स्वच्छते वरून प्रशासनास ' ब्लॅकमेल' करण्याचा काहींचा प्रयत्न: सुरजदादा बनसोडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 29, 2022

स्वतःच्या मर्जीतील ठेकेदरास कामे मिळावीत म्हणून स्वच्छते वरून प्रशासनास ' ब्लॅकमेल' करण्याचा काहींचा प्रयत्न: सुरजदादा बनसोडे

 स्वतःच्या मर्जीतील ठेकेदरास कामे मिळावीत म्हणून स्वच्छते वरून प्रशासनास ' ब्लॅकमेल' करण्याचा काहींचा प्रयत्न: सुरजदादा बनसोडे


अधिकाऱ्या प्रती स्वतःची मळमळ व्यक्त करणाऱ्यांकडून 'सफाई कामगारांचा' होणार अपमान सहन केला जाणार नाही !


सांगोला (कटूसत्य वृत्त):- शहरातील स्वच्छतेचं निमित्त करून आपल्या मर्जीतील व्यक्तीस नगरपालिकेच्या स्वनिधी मधून विकास कामे मिळवून देवून त्याचा व स्वतःचा "विकास" करून घेण्यासाठी प्रशासनास ब्लॅकमेल' करण्याचा नवीन धंदा सांगोल्यात काही नेत्यांनी सुरू केला आहे. 'जिल्हाधिकारी कार्यालय' कुठल्या दिशेला आहे याचा 5 वर्षात गंध नसलेले नेते प्रशासकीय काळातील कारभारावर बोलून अकलेचे तारे तोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असून सांगोला ची जनता सुज्ञ असून 8 महिन्यांच्या प्रशासकीय काळात मुख्याधिकारी आणि प्रशासक म्हणून तहसीलदार यांनी 5 वर्षात न झालेले अनेक विषय तडीस नेले असल्याचे जनतेला ठावूक असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुकाध्यक्ष मा.सूरजदादा बनसोडे म्हणाले.

चुकीच्या पद्धतीने बिनबुडाच्या बातम्या देवून प्रशासनावर दबाव आणून विकास कामे मिळवून आपल्या हस्त्कास पुढ करून "मलिदा" खायला आसुसलेला हा नेता स्वतःच्या स्वार्थासाठी अप्रत्यक्ष रित्या संपूर्ण सफाई कामगारांचा अपमान करीत असून हा संपूर्ण प्रकार कदापि सहन केला जाणार नाही असे सूरज बनसोडे म्हणाले.नगरपरिषदेच्या आरोग्य कामात काम करणारे बहुतांश कर्मचारी हे भीमनगर, साठेनगर भागातील असून प्रशासन कश्या सोबत खातात याच कसलही तारतम्य नसलेल्या व आपल्या संपूर्ण टर्म मधे स्वतःच्या "इगो" साठी सतत प्रशासना सोबत विनाकारण वाकड्यात शिरणाऱ्या या नेत्याने प्रशासनावरील स्वतःची मळमळ व्यक्त करण्यासाठी दलीत, बहुजन समाजाच्या सफाई कामगारांचा सुरू केलेला हा अपमान यापुढे सुरू राहिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी बहुजन समाजावरील अन्यायास नेहमी वाचा फोडणाऱ्या माजी नगरसेवक तथा रीपाई तालुकाध्यक्ष सूरजदादा बनसोडे यांनी दिला.

शहराची स्वच्छता ही फक्त नगरपालिका प्रशासन किंवा सफाई कामगार यांची नसून लोक प्रतिनिधी,शहरातील प्रत्येक नागरिक यांची ती सामूहिक जबाबदारी आहे. एखादा स्वच्छ केलेला परिसर जर परत परत अस्वच्छ केला जात असेल तर जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी याबाबत अधिक जागरूक होने गरजेचे आहे. परंतु प्रशासना सोबत सतत वाद घालून संपूर्ण पंचवार्षिक मधे शहराच्या विकासास ठप्प करण्यास कारणीभूत असणाऱ्यांकडून या गोष्टी कळण्याची अपेक्षा देखील नाही. इतरांवर आरोप करणाऱ्या या नेत्याने ठेकेदार नसून देखील आपल्या हस्तकला 5 वर्षात कोट्यावधींची विकास कामे देवून त्याच्या मार्फत भरपूर मलिदा खाल्ला असल्याचं सुज्ञ जनता जाणून आहे. प्रशासकीय काळात यांच्या मलिदा खाण्यावर निर्बंध आल्याने यांची मळमळ बाहेर निघत आहे. 

नगरपालिकेला 2 प्रमुख प्रकारचा निधी मिळतो. जनतेच्या कर भरण्यातून मिळणारा निधी यास 'नप फंड' किंवा ' स्वनिधी' म्हंटले जाते आणि हा निधी देखभाल दुरुस्ती च्या कामांसाठी वापरायचा असतो विकास कामांसाठी नाही. विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत तसेच नगरविकास विभागा कडून वितरित निधी वापरायचा असतो जो नवीन कामांसाठी असतो. परंतु या नेत्याने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि मलिदा खाण्यासाठी देखभाल दुरुस्ती साठी असलेल्या नगरपालिकेच्या स्वानिधितून स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांना खैरात वाटली. यातून नप फंडाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून त्यास स्वतःची मलिदा खाण्याची हाव कारणीभूत असताना त्यांनीच नप फंड तसेच कर्मचारी पगारावर बोलणे म्हणजे "चोराच्या उलट्या बोंबा" असून बहुजन, दलित समाजातील सफाई कामगारांचा अपमान यापुढे सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सूरजदादा यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages