न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णीचे एन.एम.एम.एस परीक्षेत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 30, 2022

न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णीचे एन.एम.एम.एस परीक्षेत यश

 न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णीचे एन.एम.एम.एस परीक्षेत यश


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी ता. माढा या विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी एन.एम.एम. एस परीक्षेत उत्कृष्ट  यश मिळवून परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत विद्यालयाचे उत्तुंग यश मिळवले आहे.
                     अथर्व सुभाष काळे आणि प्रणव संतोष भोंग हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तसेच ऋषिकेश शिवाजी बोथै, यशराज जालिंदर सरडे, मानस प्रमोद देशमुख, राजवर्धन महादेव गायकवाड, कु. शिवकन्या विशांक मोरे, कु. अमृता अशोक शिंदे, समर्थ नागनाथ खोचरे, संस्कार बबन काळे हे सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत.एन एम एम एस पात्र 2 विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी पासून  12 वी पर्यंत दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्या ला 12000/- रुपये  प्रमाणे प्रत्येकी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच सारथी एन एम एम एस पात्र विद्यार्थ्यांना  9600/- रुपये प्रमाणे 38400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहेत.
                      रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील,व्हॉईस चेअरमन ॲड.भगीरथजी शिंदे, सहसचिव साळुंके,विभागीय चेअरमन संजीवकुमार पाटील,विभागीय अधिकारी गोडसे,स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन,सर्व सदस्य,सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य टेंभुर्णी, पालक शिक्षक संघ,शाळा व्यवस्थापन समिती,पंचक्रोशीतील सर्व नागरीक, विद्यालयाचे मुख्याध्यापक लेंडवे, तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक,विभाग प्रमुख,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व पालक यांच्या वतीने सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages