अकार्यक्षम ग्रामसेवकांच्या आठमुठेपणामुळे लक्ष्मीनगरचा विकास खुंटला
स्वतःला अतिशहाणे समजणारे लंगोटे यांची बदली करण्याची ग्रामस्थांची मागणी
सांगोला (कटूसत्य वृत्त):- गाव पातळीवर विकासाचा केंद्र बिंदू ठरत असलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी शासन विविध लोक विकासाच्या योजना राबवित आहे. गावचा विकास करण्यासाठी जसा सरपंच जबाबदार आहे, तेवढाच ग्रामसेवक जबाबदार आहे.लक्ष्मीनगर ता सांगोला या गावातील प्रशासनाचा प्रमुख म्हणून दत्तात्रय लंगोटे हे काम पाहत आहेत.पण गावात नेमणूक झाल्यापासून दीड वर्षात कोणतेही विकास काम केले नाही. कामाच्या बाबतीत नेहमीच विविध कारणाचा पाढा ते वाचत आहेत. काम कमी अडचणी ज्यादा अशीच ओळख त्यांची ग्राम प्रशासनात असल्याचे बोलले जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे. कर्तव्यात कसूर करुन त्यांनी लक्ष्मीनगरचा पदभार स्वीकारल्यापासून कोणता शासकिय निधी विकास कामासाठी वापरला,याची चौकशी करून अशा निष्क्रिय,अकार्यक्षम, शासनाचा पगार फुकट लाटणाऱ्या ग्रामसेवकांची बदली करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
मुळातच गावचा कारभारी असणारे सरपंच, सर्व सदस्य पक्षीय भेदभाव बाजूला सारून गाव विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. पण ग्रामसेवकांची गावचा विकास करण्याची मानसिकताच नसल्याने विविध योजना गावपातळीवर येत नाही. त्यामूळे गावचा विकास खुंटला आहे. अनेक लोकांची कामे ग्रामसेवक लंगोटे हे जाणून बुजून करीत नाहीत, अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि सामान्य नागरिकांचे फोन उचलत नाहीत."बघू या, करू नंतर,"या शब्दाच्या बाहेर ते गेले नसल्याने गावचा विकास झाला नाही. वित्त आयोगातील लाखों रूपये धूळ खात पडून आहेत. परिणामी सर्व सामान्य जनता मात्र ग्रामसेवकांच्या या हेकेखोर स्वभावाला वैतागली असून त्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे.
लाखों रुपयांचा निधी या निष्क्रिय आणि अकार्यक्षम ग्रामसेवकांमुळे धूळ खात पडून आहे. पण या पठ्ठ्याला गावचा विकास करण्याचे काही सोयर सूतक पडले नाही. सरपंच आणि सर्व सदस्यांनी विकास कामाबद्दल विषय काढला की हे महाशय वेळ मारून नेत असल्याने सर्वच नागरीक ग्रामसेवक लंगोटे यांच्या कामावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामविकास झाला पाहिजे, लोक सहभागातून गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. हा ध्यास घेवून सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे हे प्रयत्न करीत आहेत. सरपंच आणि सर्व सदस्यांनी गाव विकासासाठी ग्रामसेवकांना सहकार्य करा असे आवाहन केले होते.पण ग्रामसेवकच अकार्यक्षम निघाले, तिथे साहेब तरी काय करणार?तरी येत्या काळात लक्ष्मीनगर येथील सरपंच आणि सदस्य गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांची भेट घेणार आहेत.
या पूर्वी विस्तार अधिकारी श्री फुले यांना गावातील अनेक सदस्यानी गाव विकासासाठी लक्ष देण्याची विनंती केली होती. पण गोड बोलण्यात पटाईत असलेले फुले यांनी आपल्या तक्रारी लेखी द्या, असा उलट सल्ला देवून ग्रामसेवक लंगोटे यांना साधी विचारणा करण्याचे ही धाडस दाखविले नाही.मुळातच भ्रष्ट आणि कामाच्या टक्केवारीत मग्न असलेल्या विस्तार अधिकारी फुले यांना ही आपल्या अखत्यारीत येणाऱ्या गाव विकासाचे देणेघेणे नसल्याचे दिसून आले.

No comments:
Post a Comment